लातूर शहर महानगरपालिका - राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटीपदाच्या मुलाखत प्रक्रिये बाबत...
Walk -in-Interview (थेट मुलाखत)
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान व 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत मंजूर नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र (आयुष्यमान मंदिर) साठी आवश्यक वैदयकिय अधिकारी व इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यासाठी नुकतीच महानगरपालिके मार्फत पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली.सदरील पदभरती प्रक्रियेनंतर देखील कांही वैदयकिय अधिकारी यांची पदे रिक्त राहिली आहेत.
तरी रिक्त राहिलेल्या वैदयकिय अधिकारी पदासाठी दि.12/03/2024 रोजी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत ST प्रवर्गासाठी 01, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत SC प्रवर्गासाठी 03, वि.जा.(अ)प्रवर्गासाठी 01, भ.ज.(ड) /वि.मा.प्र.प्रवर्गासाठी01या रिक्त पदांच्या पदभरतीसाठीतसेच आरक्षण लागू नसलेल्या 01 Physician, 03 Pediatrician, 02 Obstetrics & Gynecologist, 02 Ophthalmologist, 03 Dermatologist, 04 Psychiatrist, 04 ENT Specialist या पदांसाठी याप्रमाणे एकूण 25 पदांसाठी Walk -in-Interview (थेट मुलाखत) मा.आयुक्त यांचे कक्ष,लातूर मनपा मुख्य कार्यालय ,मेन रोड,लातूर येथे सकाळी 11 ते सायं 5:00 या वेळेत आयोजीत करण्यात आली आहे.
तरी ईच्छूक उमेदवारांनी विहित नमून्यातील अर्ज भरुन आपल्या मुळ शैक्षणिक कागदपत्रासह व सर्व मुळ कागदपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रतीच्या एका संचासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.