ही लढाई आहे संविधान वाचविण्याची
काँग्रेस महाविकास आघाडीच्या
पदाधिकारी बुथ कार्यकर्ता मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद
उदगीर : प्रतिनिधी
लोकसभेची निवडणुक ही केवळ निवडणुक नसून ही संविधान वाचविण्याची व्यापक
लढाई आहे़ त्यामुळे नागरिकांनी काँग्रेस महाविकास आघाडीच्या पाठीशी आपली
शक्ती उभी करुन संविधान वाचविण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन
उदगीर येथील विशाल फंक्शन हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या काँग्रेस महाविकास
आघाडीच्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आले़.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस
बसवराज पाटील नागराळकर, जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष श्रीशैल
उटगे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कल्याण पाटील, उषा कांबळे, महीला
जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिला पाटील, व्हा. चेअरमन रविंद्र काळे, मधुकर
एकुरगेकर, मारूती पांडे, मन्मथअप्पा किडे, संतोष तिडके, प्रिती भोसले,
सरोजनी बिराजदार, चारूशीला पाटील, शिवाजीराव हुडे, शिवाजीराव मुळे, अजीम
दायमी, सोपान ढगे, प्रभाकर काळे, संतोष पाटील, रामकिशन सोनकांबळे, संजय
पवार, बालाजी गुरुडे, गोविंद भालेराव, चंदन पाटील नागराळकर, मंजुरखां
पठाण, महेबुब शेख, गोविंद भालेराव, प्रकाश खटके,शिवाजी देवनाळे, मोहन
पाटील, विवेक जाधव, चदकांत टेगाटोले, राजकुमार भालेराव, बालाजी पाटील
नेत्रगांवकर, महेश धुळशेटटे, श्रीमंत सोनाळे, पद्माकर उगिले, अभिजीत
दायमा, कैलास पाटील, मंजुखॉ पठाण, रामेश्वर बिराजदार, गजानन सताळकर,
चंदकांत खटके, धनराज दळवे, श्रीकांत पाटील, ॲड. बनसोडे, नाना ढगे,
ज्ञानोबा गोडभरले, संतोष बिरादार, कुमार पाटील, अशिष राजूरकर, पदमाकर
उगीले, नामदेव बिरादार, विनोद पाटील, अनिल पंचाकक्षरी यांच्यासह काँग्रेस
महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़.
Tags:
Udgir