माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते
दि अमाला रेस्टॉरंट अँड ब्याकवेट्स शुभारंभ
लातुर प्रतिनिधी : दि. १२ एप्रिल २०२४
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे
माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन व
दीप प्रज्वलन करून शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी लातुर शहरातील
औसा रिंग रोड वरील सोना नगर या ठिकाणी दि अमाला रेस्टॉरंट अँड
ब्याकवेट्सचा शुभारंभ करण्यात आला.
प्रो .प्रा. धनंजय कोंबडे आणि किरण उटगे यांनी सुरु केलेल्या या दि अमाला
रेस्टॉरंट अँड ब्याकवेट्सच्या माध्यमातून लातूरच्या खवय्यांना स्वादिष्ट
व रुचकर, शुद्ध शाकाहारी पदार्थ ते सुध्दा माफक दरात उपलब्ध करुन देण्यात
आली आहेत. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी रेस्टॉरंट डायनिंग
हॉल,फंक्शन हॉल,कॉन्फरन्स पाहणी करून आसन व्यवस्था, ईटेरियरचे कौतुक
केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की,
लातुरच्या होतकरु आणि तरुण सहकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना लातूरमध्ये
साकारत या रेस्टॉरंटची उभारणी केली आहे हे कौतुकास्पद आहे. लातूरच्या
आजच्या या पिढीतील युवकांनी एकत्रित येऊन रेस्टॉरंट व्यवसायातील
आंतरराष्ट्रीय दर्जाची बोहोमियन, फ्रेंच थीम या ठिकाणी साकारली असून
यामुळे एक वेगळेपणा यात जाणवतो आहे. जे जे नवं ते ते लातूरला हवं हे आपण
आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पासून ऐकत मार्गक्रमण करत आलेले
आहोत आणि यासाठी आपल्या प्रत्येकाचा हातभार आजवर मिळत आला आहे यापुढे
देखील मिळत राहील यात शंका नाही असे सांगीतले. यावेळी पूढे बोलतांना ते
म्हणाले, आपला लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम वातावरण आपणास मिळणे ही आमची
जबाबदारी असून आपल्याला आपला व्यवसाय करताना पोषक वातावरण कसे मिळेल,
याकडे निश्चित लक्ष दिले जाईल. आपण ग्राहकांना माफ़क दरात उत्तम ग्राहक
सेवा पुरवावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी "दि अमाला रेस्टॉरंट अँड ब्याकवेट्स" चे प्रो.प्रा.धनंजय
कोंबडे व किरण उटगे आणि त्यांच्या सर्व टीमला रेस्टॉरंट व्यवसाय वृद्धी
साठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रस्ताविक करताना वैभव उटगे यांनी "दि अमाला रेस्टॉरंट अँड
ब्याकवेट्स" संदर्भात उपस्थिताना माहिती देत आलेले अनुभव कथन केले आणि
उपस्थित सर्वांचे आभार मानले. यावेळी लातुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
अध्यक्ष किरण जाधव, गणेश एस.आर.देशमुख, डॉ.प्रशांत उटगे, ॲड. दीपक सुळ,
राम कोंबडे, समद पटेल, बालाजी कोंबडे, विजय देशमुख, श्रीनिवास येलगट्टे,
सचिन दाताळ, डॉ विश्रांत भारती, डॉ. रमेश भराटे, वेदांत कोंबडे, वैभव
उटगे, दत्तू कोंबडे यांच्यासह कोंबडे व उटगे मित्र परिवाराची उपस्थिती
होती.
Tags:
LATUR