Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी










 लातुर प्रतिनिधी : दि. १२ एप्रिल २०२४
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दि.
१३ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून
आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यासह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या
निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक
कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास
को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष
संतोष देशमुख, धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी सभापती रणजीत दादा पाटील,
दिलीपसिंह देशमुख, दादासाहेब खरसुडे, चंद्रकांत वाळके, विनोद वीर, एकनाथ
पाटील, विजयकुमार साबदे, सुंदर पाटील कव्हेकर, ॲड. अतिष चिकटे, अनिल
पाटील, विशाल पाटील, संभाजी रेड्डी, पांडुरंग वीर पाटील, अंकुश शेळके,
जफर पटेल, भारत झाडके, गुरुनाथ मधुरकर, शिवाजी बोयणे आदीसह काँग्रेस
पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post