गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेत 6 कोटींचा अपहार प्रकरणी न्यायालयाने आरोंपींचा जामीन नाकाराला; आरोपींना लवकरच होणार अटक
लातूर / प्रतिनिधी : लातूर येथील माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गूळ मार्केट लातूर या पतसंस्थेतून १ जानेवारी २०१३ ते ३० डिसेंबर २०२३ या काळात ६ कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला होता, याबाबत गांधी चौक पोलिसात व्यवस्थापक भीमाशंकर पाटील व रोखपाल सोमनाथ पंडीत या दोघा जणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तेंव्हा पासून हे आरोपी पैशाच्या जोरावर सैरा वैरा फिरत आहेत .आता तर
याप्रकरणी संशयित आरोपी पाटील व पंडीत यांचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपींना लवकरच होणार अटक होणार असल्याचे समोर आले आहे.
पदावर असतांना आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करत पतसंस्थेतील दस्त, स्लिप, व्हाऊचर्स, पावत्या बनावट करून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम परस्पर स्वतःच्या फायद्याकरीता काढून घेतला असल्याचा, खातेदारांच्या नावे बोगस कर्ज प्रकरणे करून ती रक्कमही हडप केल्याचा आरोप आसून अनेक ठेवीदारांचे प्रत्यक्ष आकडे मोठे पण पतसंस्थेच्या रेकॉर्डमध्ये ते आकडे झिरो करण्यात आले .सन २०१५ पासून पतसंस्थांना पॅनल वरील सनदी लेखापालामार्फत लेखापरीक्षण अहवाल स्वतः दाखल करण्याचा नवीन कायदा पारित झाला. जर तत्कालीन व्यवस्थापक व रोखपालांनी लेखा परीक्षण अहवालात गोलमाल केला असेल तर त्यात पतसंस्थेतून, संचालक मंडळातून किंवा उच्चपदावर असलेल्यांनी, नेमके बळ कुणी दिले ?, हा रस्ता दाखवला कोणी, पतसंस्थेत मागील दहा वर्षांपासून अपहार होत असताना तत्कालीन चेअरमनसह संचालक मंडळाच्या निदर्शनास कसे आले नाही, इतक्या उशिरा कसे आले? याप्रकरणी अदयापपर्यंत दोघांवरच गुन्हे दाखल झाले असले तरी याप्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे, त्या दोघांच्या पाठीमाघे कोणाचे हात आहेत, व एकूण किती रुपयांचा हा अपहार आहे हे शासकीय लेखा परीक्षकामार्फत चौकशी झाल्यावरच समोर येणार आहे परंतू कित्तेक महिने उलटून गेले आद्याप पर्यंत तपासात काहीच हालचाल झाली नाही .अर्थिक गुन्हे शाखेने हा तपास पुन्हा गांधी चौक पोलिस स्टेशन ला देण्यात आला असल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास गांधी चौक पोलिस स्टेशन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या दोन आरोपींचा जामीन अर्ज नाकारल्याने अटक होण्याच्या भितीने सैरावैरा धावत आहेत .आता या आरोपींना गांधी चौक पोलिस लवकरच अटक करतील यात काही शंका नाही.
Tags:
LATUR