गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
गंगाधाम च्या पाठिमागे अवैध जुगार अड्ङयाचा आला बहर..तिर्रट आणि आंदरबाहर या खेळाने केला कहर..!
![]() |
प्रतिकात्मक |
लातूर -लातूर शहरामध्ये अवैध धंद्यांसोबतचं जुगार अङङयांनी कहर केला असून गरुड चौक येथील गंगाधाम च्या पाठिमागे जुगार अड्डा चालू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.विशेष म्हणजे या अतिषय गजबजलेल्या आणि रहिवाशी ठिकाणी हा जूगार अड्डा चालू असून याठिकाणी तिर्रट आणि आंदरबाहर सारखे खेळ करुन तरुण पिढीला वेसनाधीन बनवत आहेत.लाखोंरूपयाची केटी काढून स्वत:चे उकळ पांढरे करणारे पाच ते सात तरुण या मध्ये सहभागी असून हे लोक २०ते२५जणांना बोलवून रोज सांयकाळी ४ ते दुसर्या दिवशीं सकाळ पर्यंत ह्या जूगार अड्डा मध्ये खेळत बसतात.आमचे काही वाकडे होणार नाही या अविर्भावात ते वागत असून पोलिसांचेही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.अशा या गंभीर विषयांकडे माननिय पोलिस अधिक्षक साहेबांनी वेळीच लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Tags:
LATUR