निलंगा विधानसभा मतदारसंघातील १० रस्त्यांची होणार दर्जोन्नती
माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश
निलंगा प्रतिनिधी:-निलंगा मतदारसंघात दर्जेदार रस्ते निर्माण होवून वाहतुकीच्या सोयी-सुविधा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याअनुषंगानेच शासनाकडे नेहमीच त्याचा पाठपुरावा सुरू असतो. या पाठपुराव्यातूनच निलंगा विधानसभा मतदारसंघातील १० रस्त्यांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दर्जोन्नती होणार असुन त्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्याचबरोबर याकामाकरीता निधी उपलब्ध झाला असुन लवकरच या रस्त्यांच्या कामांना सुरूवात होईल असे आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले आहे. सदर रस्त्यांना दर्जोन्नती दिल्याबददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
निलंगा मतदारसंघात विकासाचा ओघ कायम सुरू असुन यासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहेत. मतदारसंघातील रस्त्यांचा दर्जा सुधरावा आणि वाहतुकीच्या सोयी-सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होवून प्रवास सुखकर व्हावा याकरीता माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर आग्रही असतात. त्याअनुषंगाने केंद्र व राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावाही सुरू असतो. या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मतदारसंघातील १० रस्त्यांच्या दर्जोन्नतीला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. यामध्ये १) प्रजिमा-३३ जवळगा ते कवठाळा रस्ता कि.मी.४.९०० , २) टी.०३ बोरोळ ते सिंधीकामठ रस्ता कि.मी.३.१००, ३) प्रजिमा-३८ ते दैठणा ते शेंद (उत्तर) रस्ता कि.मी.३, ४) प्रजिमा-३३ ते येरोळ ते सुमठाणा रस्ता कि.मी.३.२७० , ५) सावरगांव-हिप्पळगाव ते रापका रस्ता कि.मी.४ , ६) रामा-१४५ ते होनमाळ रस्ता कि.मी.३, ७) सोनारवाडी-डिगोळ सुमठाणा ते दैठणा रस्ता कि.मी.४.९००, ८) रामा-२३६ मसलगा ते आंबेगांव रस्ता कि.मी.३.०२०, ९) रामा-२४४ माकणी-कोयाचीवाडी ते सावरी रस्ता कि.मी.६.७९० , १०) रामा-२४० जाजनूर ते झरी रस्ता कि.मी.३.६०० या रस्त्यांचा समावेश आहे. याकरीता आवश्यक असणारा निधीही प्राप्त झाला असल्याने आता या रस्तयांचा दर्जा सुधारणार आहे. सदर रस्त्यांचा दर्जा सुधरावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडुन होत होती. ही मागणी लक्षात घेवूनच यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा आ.निलंगेकर यांनी केलेला होता.
या कामांची लवकरच सुरूवात होईल असे माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले असुन सदर कामांना मंजुरी देवून निधी उपलब्ध करून दिल्याबददल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीष महाजन यांच्यासह माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांचे मतदारसंघातील जनतेने आभार व्यक्त केले आहेत.
Tags:
LATUR