गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकारी कार्यालयातील २३कोटी अपहार प्रकरणी दोघां आरोपींना जामीन तर आत्ता पर्यंत तब्बल ६कोटीची रिकव्हरी
लातूर -जानेवारी 2023 मध्ये शासकीय बँक खात्यातून 23 कोटी रुपयाचा अपहार झाल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांचे कडून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यांमधील फिर्याद प्रमाणे "जिल्हाधिकारी कार्यालयात कारकून असलेला मनोज फुलबोयने याच्याकडे शासकीय बँक खात्याचा अभिलेख लिहिण्याची जबाबदारी होती. याचाच गैरफायदा घेऊन, कट रचून शासकीय बँक खात्यातून पैसे काढून सदरची रक्कम गुन्ह्यातील मुख्य आरोपी अरुण नागनाथ फुलबोयने याच्या तन्वी ॲग्रो एजन्सी फॉर्मच्या नावाने असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्याचा डाव रचण्यात आला होता.आरोपींनी ठरविलेल्या कटाप्रमाणे कामास सुरुवात करून तनवी अग्रो एजन्सी नावाचे फॉर्म उघडून जिल्हाधिकारी कार्यालयातील कारकून असलेल्या मनोज फुलबोयने याने बनावट RTGS (आरटीजीएस) प्राधिकारपत्राच्या आधारे तनवी अग्रो फार्मच्या नावाने रक्कम वर्ग केल्या व शासनाची फसवणूक करण्यात आली"
अशाप्रकारे गुन्ह्याच्या प्राथमिक तपासामध्ये 22 कोटी 87 लाख 62 हजार 25 रुपये रक्कम शासकीय बँक खात्यातून काढून अपहार करण्यात आला.
या प्रकरणात आत्तापर्यंत चाहने/प्राॅपर्टी मिळून ३कोटी ८५लाख रु जप्त करण्यात आले तर १कोटी १४हजार रोख रक्कम रिकव्हर करण्यात आली तसेच तन्वी ॳॅग्रो एजन्सीचा १कोटी ५०लाखाचा माल जप्त करण्यात आला असून तब्बल १८ बॅंक खाते सिज करण्यात आली आहे.
याप्रकरणी अरुण फुलबोयने आणि सुधीर देवकते या दोन आरोंपींना न्यायालयाने जामिन मंजूर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.मुख्य अरोपी मनोज फुलबोयने कारगरागृहात असून प्रकरण अंतिम टप्यात आसल्याने लवकरच निकाल लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Tags:
LATUR