Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कन्यका परमेश्वरी सह. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

कन्यका परमेश्वरी सह. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा
- --- सभासदांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण


 

सावधान... गृहनिर्माण संस्थेत होत आहेत फसवणूकीचे प्रकार  
कोणतीही गृहनिर्माण संस्था काढत असताना कमीत कमी ३०० सभासद लागतात याचा फायदा घेवून काही लोक जागा खरेदी करण्यासाठी ३०० सभासदाची जुळवाजुळव करतात त्या नंतर पैशे गोळा करण्यासाठी सहायक निबंधक कार्यालयात अकाउंट ओपनींग साठी अर्ज करतात हा अर्ज नियमानुसार २५दिवसासाठी वैध असतो त्यानंतर सर्व कागद पत्रे कार्यालयाकडे जमा करुन संस्थेची परवाणगी साठी मागणी केली जाते परंतू बरेच संस्था हे न करता फक्त बॅंक अकाउंट काढण्यासाठी याचा वापर करतात फ्लॅट देण्याचे अश्वासन देतात हे अश्वासन दिल्यानंतर जागा खरेदी केली जाते त्यात कमीशन पोटी काही एक्कर जमीन स्वत:ताच्या नावावर करून घेतात याची भनकही सभासदांना लागू दिली जात नाही आणि येथेच सभासदांची फसवणूक होते पैशाची अफरातफर होते त्यामुळे वर्षानु वर्ष असे गृह निर्माण प्रकल्प पडून रहातात आणि वेळ निघून गेल्यानंतर मग सभासदांना आंदोलनाचा पर्याय निवडावा लागतो. सहाय्यक निबंध कार्यालय अशा प्रकरणामध्ये लाचार दिसून येतात संपुर्ण कागदपत्रे कार्यालयात सादर केली नसल्या मुळे कार्यवाही होत नाही अता अशा प्रकरणांचा धडा सर्वसामान्य नागरिकांनी घेवून वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे.अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल तर तात्काळ पोलिस स्टेशन अथवा जिलाधिकारी कार्यालयाकडे संपर्क करुन तक्रार करणे अवश्यक आहे.



लातूर / सभासदांची फसवणूक करून गृहनिर्माण संस्थेचे बनावट कागदपत्रे तयार करून नवीन बँक खाते तयार करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी संस्थेच्या सभासदांनी सोमवार 22 रोजी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले.
           यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की लातूर येथील श्री. कन्यका परमेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आहे असे भासवून व सहकारी शब्दाचा दुरुपयोग करुन जवळपास ३२३ सभासदाकडुंन खोट्या, बनावटी पावत्याद्वारे पैसे जमा करुन फसवणुक करणाऱ्या हरिश्चंद्र रामचंद्र कोटलवार, श्रीरामचंद्र निवृत्ती देवशेटवार, तुकाराम गुंडाप्पा कोटगिरे, विकास बालाजी पारशेवार, माणिक बाबुराव बट्टेवार व इतर यांचेविरुद्ध कार्यवाही करा,सहकार विभागाची पुर्व परवानगी न घेता श्री. कन्यका परमेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था या नावाने बँकेत खोटे व बनावट कागदपत्राआधारे खाते उघडून पैशाची अफरातफर करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा,
संस्थेच्या नावे असलेले अनुक्रमे हरंगुळ व चाटा शिवारातील शेतजमीन एमआयडीसी विमानतळ व पाझर तलावासाठी संपादित झालेल्या जमीनीचा मावेजा खोटे व बनावटी कागदपत्राआधारे परस्पर उचलून शासनाची व सभासदांची फसवणूक करुन पैशाचा अपहार केल्याची चौकशी करावी,संस्थेचे कार्यवाह रामचंद्र निवृत्ती देवशेटवार यांच्या सहीने दोन सर्व्हे नंबर/गट नंबर टाकून प्रमाणपत्र अवैध पद्धतीने संस्थेच्या नावाने कोणताही अकृषी व रेखांकन आराखडा मंजूर नसतांना मंजूर असल्याचे भासवून सभासदांची फसवणूक करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करावी, संस्थेच्या नावाने मौजे चाटा, मुरुड अकोला, भोयरा, हरंगुळ, आखरवाई आदी गावाच्या शिवारात शेतजमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करावी तसेच दि. १६ ऑक्टोबर २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन, जिल्हा पोलीस अधिक्षक, लातूर यांच्याकडे दिलेल्या फिर्यादीनुसार कन्यका परमेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या कथाकथीत पदाधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंद करुन चौकशी करण्याच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी मद्रेवार संगमनाथ, जनार्धन चन्नावार, विद्यासागर गुट्टेवार, रमाकांत रायवार, नंदकुमार चितंल्बार,चिद्रेवार लक्ष्मीकांत, मद्रेवार रामकिशन,गादेवार उमाकांत, पेन्सलवार अरुण,मुतेवार राजकुमार,चिद्रेवार गजानन, चिद्रेवार अनिल, दत्ता चिद्रेवार,गबाळे सुवर्णा, झंवर राधाकिशन,बनभेरु अनिल हरीकिशन,पोलावार शरद किशन, बटमवार बाबुराव माधव, सागर रायेवार, पेन्सलवार दिपक ,पेन्सलवार राजेश्वर,पेन्सलवार आशोक निवृत्ती,देबडवार बालाजी उध्दवराव, चिगळे सुजीत नंदकुमार, राम दामोधर वटमवार, पिलाजी रामचंद्र, किशोर डुबे, मनोज गुंडेवार, प्रमोद डुबे, सुदीप कलकोटे, गोपाळ पाथरकर, जयप्रकाश डुबे, सुशील डुबे, संजय देवसटवार, के. एल. सुरेश, धोंडीराम पेन्शलवार, राम पेन्शलवार, गुणवंत बिराजदार यांची उपस्थिती

Previous Post Next Post