Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर जिल्हा रूग्णालय जागा हस्तांतरणासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे

लातूर जिल्हा रूग्णालय जागा हस्तांतरणासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु - जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे



लातूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी विभागाच्या जागेचा मोबदला अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासकीय स्तरावर पाठपुरावा सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी माझं लातूर परिवाराच्या शिष्टमंडळास दिली आहे.

जिल्हा रुग्णालय जागा हस्तांतरण यासह विविध सामाजिक विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली. १९ जून २०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासन निर्णयात लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. या निर्णयानुसार वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय लातूर येथील सर्व्हे क्र.३२ मधील १० एकर जमीन जिल्हा रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांनी या जागेचे मूल्यांकन रक्कम ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये असल्याचा अहवाल सादर केला होता. जागा हस्तांतरण प्रक्रिया जास्तीत जास्त ६० दिवसांच्या कालावधीत पूर्ण करावी असेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज माझं लातूर परिवाराने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, तहसीलदार सौदागर तांदळे यांची भेट घेतली. 

जिल्ह्यातील अप्लास्टिक अनेमिया, आणि थायलेसिमिया रुग्णांना मोफत रक्त आणि रक्तघटक (एस डी पी सह) देणे बंधनकारक असताना यासाठी रक्तपेढ्या शुल्क आकारतात. एस डी पी साठी रक्तदाते उपलब्ध होतात मात्र या प्रक्रियेसाठी तब्बल १० हजार रुपये पर्यंत शुल्क आकारले जाते. अशा गरजू रुग्णांना मोफत रक्त आणि रक्टघटक (एस डी पी सह) उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी माझं लातूर परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

माझं लातूर माझी परसबाग हा उपक्रम माझं लातूर परिवाराच्या वतीने प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमास कृषी आणि वन विभागाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. या शिष्टमंडळात सतीश तांदळे, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, काशीनाथ बळवंते, उमेश कांबळे, ॲड. राहूल मातोळकर, रत्नाकर निलंगेकर यांचा समावेश होता.
Previous Post Next Post