मांजरा शुगर (कंचेश्वर) येथे मील रोलर पुजन व वृक्षारोपण संपन्न.
माजी जि.प.अध्यक्ष संतोष देशमुख, रेणाचे व्हा चेअरमन अनंतराव देशमुख,जिल्हा बँक संचालक राजकुमार पाटील,अनुप शेळके,संभाजी रेड्डी,मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडीत देसाई, जागृतीचे व्यवस्थापक गणेश येवले, जिल्हा बँक कार्यकारी संचालक एच जे जाधव,मांजरा शुगरचे जनरल मॅनेजर सतिश वाकडे, जनरल मॅनेजर फिल्ड अँड कृषी अधिकारी रामानंद कदम,टेक.जनरल मॅनेजर अजित कदम, चिफ केमिस्ट,बाळासाहेब पेठे, मुख्य शेतकी अधिकारी नारायण धांडे,डिस्टलरी मॅनेजर उत्तम -हायकर, कार्यालयीन अधिकारी अभय तिवारी,सिव्हील इंजिनीअर,गोकुळ थावरे,परचेस ऑफीसर संतोष जाधव आदींची उपस्थिती होती.
मागील गळीत हंगामात कारखान्याने गाळपास आलेल्या ऊसाला १० दिवसात संपूर्ण एफआरपीचे एकरकमी ऊस बील देवून शेतकरी बांधवांच्या मनात विश्वास निर्माण केला असल्याने गळीत-हंगाम २०२४-२५ मध्ये आपला ऊस गाळपासाठी मांजरा शुगर (कंचेश्वर) कडे देणार असल्याचा निर्धार ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला असल्याचे दिसून येत आहे.
--
Tags:
LATUR