लातूर मध्ये प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाओ यात्रेचे आगमन होणार
लातूरात अॅड प्रकाश आंबेडकर यांनी चैत्यभूमी पासून काढलेली आरक्षण बचाओ यात्र लातूर मध्ये येत असून गिरवलकर मंगल कार्यालय, बार्शी रोड , लातुर येथे त्यांची विविध मागण्यासाठी जाहिर सभा होणार आहे.
एससी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. एस सी एस टी आणि ओबसी ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे अशा मागण्यासाठी हि यात्रा काढण्यात आली आहे. हि यात्रा लातूर मध्ये उद्या पोहचणार असून संध्याकाळी प्रकाश आंबेडकर यांची जाहिर सभा होणार आहे . या व इतर विविध मागण्यासाठी सह अनेक महत्त्वाच्या विषयांवर हि यात्रा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 'आरक्षण बचाव यात्रे'ला सुरुवात झाली आहे आणि २९ जुलै २०२४ रोजी लातूर येथे आरक्षण बचाव यात्रेच आगमन होणार आहे त्यानिमित्ताने लातूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
सोमवार २९ जुलै सायंकाळी ६ वाजता, पत्ता - गिरवलकर मंगल कार्यालय, बार्शी रोड , लातुर आरक्षण बचाव यात्रेला आणि सभेला सर्व आरक्षणवाद्यांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती सम्यक विद्यार्थी आंदोलनचे नागेश सातपुते यांनी केली आहे .
Tags:
LATUR