डॉ. गणपतराव मोरे यांच्या हस्ते प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचे स्वागत
लातूर, दि. २७ - येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य तथा मराठवाडा पालक संघाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे, विभागीय मार्गदर्शक प्रा. मुकुंद बोकारे, ‘जुक्टा’ संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजीराव वडजे, ‘जुक्टा’ संघटनेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष प्रा. महेश देशमुख, आदी मान्यवरांनीही प्राचार्य केंद्रे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवकांत वाडीकर, विष्णू कराड, परमेश्वर गित्ते आदी उपस्थित होते.
Tags:
LATUR