देशहिताचा आणि सर्वांगीण प्रगतीचा अर्थसंकल्प
_भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड
शेतकरी, महिला, तरुणासह सर्वच क्षेत्राच्या विकासाला बळ देणारा देशाच्या हिताचे रक्षण आणि सर्वांगीण प्रगतीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत सादर केला या अर्थसंकल्पातील विविध विभागाच्या तरतुदीमुळे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वात देशाची होत असलेली सर्वांगीण प्रगती अधिक गतीने झाल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी दिली.
जगातील यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सलग सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेच्या सभागृहात मांडला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून आ रमेशआप्पा कराड म्हणाले की, या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला असून सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे हर घर नल से जल योजनेसाठी 60 हजार कोटी रुपयांची तर पी एम किसान आवास योजनेतून 80 लाख घरासाठी 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भारताच्या विकासासाठी केलेली २.६६ लाख कोटी रुपयांची तरतूद खेड्यांचा कायापालट करणारी ठरेल,
देशाचे हित लक्षात घेऊन संरक्षण क्षेत्रासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे, युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा, शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढविणे, कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आणि शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प आहे. विविध आजारावरील रुग्णांना सुविधा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील दळणवळण सुविधा अधिक सुलभतेने करण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेला गती देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. एकूणच अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देश हिताबरोबरच देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आणि जनहिताचा असल्याचे आ रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.
Tags:
LATUR