गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
नदीपात्रातील वाळू बोटीच्या साह्याने बेकायदेशीर रित्या साठवणूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल64 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने दिनांक 06/08/2024 रोजी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हदीमध्ये मध्ये अवैधपणे वाळूचा उपसा करून, चोरटी विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक करून मांजरा नदी पात्राच्या परिसरात आडगळीच्या ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
त्यावरून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाने महसूल विभागाला सोबत घेऊन मौजे गिरकचाळ तालुका शिरूर आनतपाळ येथील मांजरा नदीच्या पात्रालगत मोकळ्या जागेमध्ये मांजरा नदीपात्रातून लोखंडी बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीररित्या शासकीय परवानगी शिवाय वाळूचा उपसा करून अंदाजे 1,110 ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेले पाच लोखंडी बोटी असा एकूण 64 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत.
वाळूचा अवैध उत्खनन करून विना परवाना चोरटी विक्री व्यवसाय साठी साठवणूक करणारे
1)भगवान भाऊराव शिंदे,
2) भगवंत भाऊराव शिंदे,
3)धनु बाबुराव शिंदे,
4) शरद बाबुराव शिंदे,
5) ईश्वर नागोराव शिंदे,
सर्व राहणार गिरकचाळ तालुका निलंगा जिल्हा लातूर.
यांच्यासह इतर आठ ते दहा लोकांविरुद्ध पोलीस ठाणे शिरूर आनतपाळ येथे कलम 303( 2) 3 (5) भारतीय न्याय संहिता व कलम 48 (7) 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार विनोद चिलमे, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख यांनी केली आहे.
Tags:
LATUR