Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माझं लातूर परिवाराच्या वतीने ५ हजार तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण

माझं लातूर परिवाराच्या वतीने ५ हजार तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण








लातूर : हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शासनाच्या या अभियानांतर्गत माझं लातूर परिवाराच्या वतीने शहरात ५ हजार तिरंगा ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले.
शहरातील सर्वसामान्य नागरीकांना आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविता यावा, देशाच्या या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होता यावे या उद्देशाने हनुमान चौक येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मान्यवरांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण करण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी कुटुंबातील महिला सदस्यांना घरावर ध्वज फडकविण्याचा मान द्यावा तसेच ध्वजासोबत सेल्फी घेऊन www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान चौक येथे पार पडलेल्या या अभियानात शहर वाहतूक पोलिस शाखेचे निरीक्षक गणेश कदम, माझं लातूर परिवाराचे सतिश तांदळे, अभय मिरजकर, डॉ सितम सोनवणे, गोपाळ झंवर, शिलरत्न सोनवणे, डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, रविंद्र गट्टानी, उत्तम लोंढे यांच्या हस्ते नागरीकांना ध्वज वितरीत करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post