Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जेएसपीएम संस्थेच्यावतीने आण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

जेएसपीएम संस्थेच्यावतीने आण्णाभाऊ साठे यांची
 जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी



लातूर -
जेएसपीएम संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपा नेते तथा किसान मोर्चा गुजरात व गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, फायनांन्स डायरेक्टर बापूसाहेब गोरे, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत गौंड, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विकास लबडे, बाळाराम पिचारे, राजकुमार खांडके, राधा कवरे, अंकुशे, आशा वाकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य गोविंद शिंदे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्याच विचारावर तरूणाईने वाटचाल करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Previous Post Next Post