Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

विद्यार्थ्यांचा संशयात्मक मृत्यू प्रकरणी लातुरात दुसऱ्या दिवशीही भीम सैनिकांचे 'जबाब दो' धरणे आंदोलन

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
विद्यार्थ्यांचा संशयात्मक मृत्यू प्रकरणी लातुरात दुसऱ्या दिवशीही  भीम सैनिकांचे 'जबाब दो' धरणे आंदोलन 



लातूर : गेल्या दीड -दोन महिन्याच्या कालावधीत लातूर शहर व जिल्ह्यात दलित समाजातील तीन तरुणाचा खून केल्याच्या विविध ठिकाणी घटना घडल्या. तर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपने हत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दोन दलित तरुणांवरील अत्याचाराच्या संतापजनक घटना घडल्या आहेत. या सर्व घटना जातीय मानसिकतेतून घडवण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील आरोपीवर खुनाचे गुन्हे दाखल करून ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत, सीआयडी मार्फत चौकशी करावी. तसेच आरोपीना तात्काळ अटक सदर खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागण्यासाठी 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात समग्र भीम सैनिकांच्या वतीने सरकार व पोलिसांच्या दिरंगाई विरोधात जबाब दो धरणे करण्यात येत आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून या आंदोलनात मोठ्या संख्येने भीमसैनिक महिला, पुरुष व तरुणाचा सहभाग होता.
लातूर शहरातील जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात शिकणाऱ्या परळी येथील 13 वर्षीय अरविंद खोपे नामक विद्यार्थ्यांचा संशयात्मक मृत्यू झाला आहे. त्या आधी चाकूर तालुक्यातील नायगाव येथील कु. सायली गायकवाड या 15 वर्षीय दलित विद्यार्थिनीचा लातूरच्या एका वसतिगृहात बलात्कार करून तिचा निर्घृणपने खून करण्यात आला. या शिवाय औसा तालुक्यातील भुसनी येथील आकाश सातपुते या दलित तरुणाची हत्या करण्यात आली. तसेच देवणी येथील सचिन सूर्यवंशी या तरुणाची हत्या केली. तसेच गांजूर दलित अत्याचार प्रकरणातील दलित कार्यकर्त्यांवरील 353 सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनामुळे संपूर्ण दलित समाज व आंबेडकर प्रेमी जनतेमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Post Next Post