विलासरावांनीच लातूरच्या विकासाची घडी बसवली
माऊली ज्वेलर्सच्या श्रावण महोत्सवाचा श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ
लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख यांनीच लातूरच्या विकासाची घडी बसवली़ त्याला
लातूरकरांनी भरभरुन साथ दिल्यामुळेच लातूरच्या विकासाची घडी विस्कटली
नाही़ आज माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि आमदार धिरज देशमुख
लातूरकरांच्या प्रचंड पाठींब्याच्या बळावरच लातूरच्या विकासाचा रथ
समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत़ देशमुख कुटूंबिय लातूरकरांच्या अपेक्षा
पुर्ण करण्यात कधीही कमी पडणार नाहीत, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले़
ज्वेलरीमध्ये अल्पावधीत स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करणाºया येथील माऊली
ज्वेलर्सच्या वतीने आयोजित श्रावण गौरी-गणपती महोत्सवाचा शुभारंभ शनिवारी
सायंकाळी विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती वैशालीताई
विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाला़ त्याप्रसंगी श्रीमती वैशालीताई
देशमुख बोलत होत्या़ प्रारंभी चेअरमन व्ही़ पी़ पाटील, संचालिका सौ़
चंद्रकला व्यंकटराव पाटील आणि पाटील कुटूूंबियांच्या वतीने उपस्थित
मान्यवरांचे स्वागत करण्यात आले़ पुढे बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख
म्हणाल्या, लातूरमध्ये जे जे नवं ते ते हवं, हे ब्रिद विकासरत्न विलासराव
देशमुख यांचे आहे़ त्यानूसार लातूरमध्ये येत असलेले नवनवीन उद्योग,
व्यवसाय, फर्म यांचे त्यांनी स्वागत करुन उद्योग, व्यवसायात येणाºया
प्रत्येकांना सातत्याने प्रोत्साहन दिले़ त्यामुळेच लातूरचा चौफेर विकास
झालेला दिसून येत आहे़ व्ही़ पी़ पाटील यांनी माऊली ज्वेलर्सच्या
माध्यमातून श्रावण गौरी-गणपती महोत्सवाचा सुरु केला आहे़ त्यास ग्राहक
भरभरुन प्रतिसाद देतील, असे आशिर्वाद दिले़
प्रास्ताविक करताना चेअरमन व्ही़ पी़ पाटील यांनी माऊली ज्वेलर्सची
वाटचाल नमुद करुन विकासरत्न विलासराव देशमुख व श्रीमती वैशालीताई देशमुख
यांच्या आशिर्वादामुळेच व्यवसायात यशस्वी झालो़ माझ्या प्रत्येक
उपक्रमाला विकासरत्न विलासराव देशमुख, श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी
खुप मोठे सहकार्य केले़ या दोघांच्या रुपाने मला माझ्या आयुष्यात गॉड
फादर आणि गॉड मदरही मिळाली़ त्यांच्या पावण स्पर्शाने माझे जीवन बदलून
गेले, असे सांगीतले़
यावेळी डॉ़ सारीका देशमुख, डॉ़ अशोक आरदवाड, डॉ़ सांगळे, महादेव साबदे,
कासले, डॉ़ हंडरगुळे, कलंत्री, बलदवा, आऱ बी़ माने, विजय पाटील, अनिल
शिंदे, आशिष व्यंकटराव पाटील, किरण आशिष पाटील, सौ़ अश्विनी धिरज शिंदे,
धिरज गोकूळ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्राहक उपस्थित होते़
Tags:
LATUR