महात्मा फुले सिग्नल कॅम्प झोपडपट्टी धारकांचे महानगरपालिके समोर आंदोलन
लातूर शहरातील असलेली महात्मा फुले सिग्नल कॅम्प झोपडपट्टी हे जवळपास 75 ते 80 वर्षा पूर्वीची होती लातूर शहर महानगरपालिकेने 22 जानेवारी 2006 रोजी कुठलेही कागदपत्रे व्यवहार न देता व प्रशासनाचे कुठलेही नोटीस न देता लातूर शहरापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर दूर अंतरावर अंबाजोगाई रोड मेडिकल कॉलेज समोर मातोश्री वृद्धाश्रमच्या पाठीमागे आर्वी गायरान येतील समशान भूमीच्या जागेतील स्थलांतर करण्यात आले असून जवळपास 16 ते 17 वर्षे पूर्ण झाले असून आम्हाला मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यात आले आहे
आमच्या प्रमुख मागण्या :
1) अंत्यविधीसाठी साधी समशान भूमी नाही समशान भूमी बांधून देण्यात यावी
2) आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही जे रस्ता लातूर शहर महानगरपालिकेने दिला होता ते रस्ता मातोश्री वृद्धाश्रम यांनी अतिक्रमण करून बंद करण्यात आला आम्हाला रस्ता चालू करून देण्यात यावा
3) आज गेल्या 17 वर्षापासून आर्वी गायरान येतील मीटरची मागणी असून सुद्धा प्रत्येक वर्षी फक्त केबल वडून नवीन पोल रविण्यात येत असून मीटर देत नाहीत मीटर देण्यात यावे तरी मी आयुक्त साहेबांना विनंती करतो की आपण हे सर्व सुविधा लवकरात लवकर आम्हाला उपलब्ध करून देण्यात याव्या हे सुविधा येणाऱ्या 5 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर, आम्ही लातूर शहर महानगरपालिका समोर उपोषणाला बसू
Tags:
LATUR