मनसे अध्यक्ष मा.श्री राज ठाकरे यांचा लातूर दौरा
लातूर -दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सोलापुर-तुळजापूर मार्गे माननीय राज साहेब यांचे आगमन लातूर जिल्ह्यात होणार आहे लातूर जिल्हा आगमन झाल्यानंतर उजनी तालुका औसा या ठिकाणी मनसे कार्यकर्ते मा.राज साहेब यांचे स्वागत करणार आहेत. त्यानंतर माननीय साहेबांचे स्वागत औसा टी पॉइंट या ठिकाणी होणार आहे त्यानंतर मा.राजसाहेब यांचे स्वागत लातूर या ठिकाणी वासनगाव पाटी येथे भव्य स्वागत आणि तेथून दुपारी ठिक 2:30 वाजता मोटरसायकल रॅली शासकीय विश्रामगृहापर्यंत काढण्यात येईल त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम राहील.*
*दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पत्रकारा सोबत चहापाणी व संवाद,विधानसभा निहाय बैठक सकाळी 9-30 वाजल्यापासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे तसेच दुपारी 1 ते 3 दरम्यान लातूर जिल्हा येथील शेतकरी तसेच प्रतिष्ठित व्यक्तीशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर चाकूर अहमदपूर मार्गे रात्री नांदेड येथे मुक्कामी जाणार आहेत त्यादरम्यान लातूर येथे गरुड चौक येथे साहेबांचे स्वागत करण्यात येणार आहे
*आपला*
*संतोष भाऊ नागरगोजे*
प्रदेश सरचिटणीस
*संजय राठोड*
जिल्हा अध्यक्ष मनसे लातुर
*मनोज (तात्या)अभंगे*
शहर अध्यक्ष,मनसे लातुर शहर
*रणवीर उमाटे*
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख
मनसे, लातूर
*बालाजी पाटील*
शहर प्रसिद्धी प्रमुख मनसे लातुर
Tags:
LATUR