आम्ही सर्व भीमसैनिक'च्या वतीने विद्यार्थ्याचा संशयित मृत्यू प्रकरणी: लातुर मध्ये जवाब दो धरणे आंदोलन, सीआयडी चौकशीची मागणी
लातूर : जिल्ह्यात वर्षभरात दलित अत्याचाराच्या घटना घडल्या असून गेल्या आठवड्यात एमआयडीसी परिसरातील एका वसतिगृहातील तेरा वर्षीय मुलाचा संशयित मृत्यू झाला. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या संशयित मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही सर्व भीमसैनिकच्या वतीने जबाब दो धरणे आंदोलन गांधी चौकात मंगळवारी सुरू करण्यात आले असून पुढील तीन दिवस आंदोलन चालणार आहे.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला असून एमआयडीसी भागातील वस्तीगृहामध्ये सातवीच्या वर्गातील अरविंद खोपे या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी,
या प्रमुख मागणीसाठी जवाब दो धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलन तीन दिवस चालणार आहे. हत्याकांडाच्या सात ते आठ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत.
लातूर शहर व जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून विविध ठिकाणी दलित युवक, विद्यार्थी हत्या व अत्याचार करण्यात आले असून त्यातील काही गुन्हा नोंद असलेले खालील प्रकरणे आहेत.
1) लातूर शहारातील एम.आय.डी.सी येथील विवेकानंद शैक्षणिक संकूल व राजमाता जिजाऊ वसतिगृहात इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या बौध्द समाजातील नामे अरविंद राजाभाऊ खोपे या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यु झाला आहे.
2) (मयत) सायली सिध्दार्थ गायकवाड, नायगाव ता. चाकूर जि. लातूर, विवेकानंद चौक पो.स्टे.
3) (मयत) आकाश व्यंकट सातपूते रा. भूसणी ता. औसा औसा पो.स्टे.
4) (मयत) सचिन शिवाजी सूर्यवंशी, देवणी पो.स्टे. उदगीर
5) विनोद पंढरी कांबळे रा. शिरूर अनंतपाळ
6) बालाजी शेषेराव कांबळे रा. शिरूर अनंतपाळ पो.स्टे.
प्रमुख मागण्या :-
1) वरील सर्व प्रकरणांमध्ये 302 व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
2) सर्व प्रकरणाची चौकशी क्क्ष्व मार्फत करण्यात यावी.
3) सर्व प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे.
4) वरील सर्व प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे.
5) लातूर जिल्ह्याला दलित अन्यायग्रस्त जिल्हा घोषित करावे.
6) वरील सर्व प्रकरणातील तपास अधिकारी बदलण्यात यावे.
7) गांजूर प्रकरणातील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांवरील 353 सारखे खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे. ૨) रिंकू बनसोडे यांच्या हत्ते ची चौकशी करण्यात यावी.
या सर्व घटनांची चौकशी करावी, विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावे अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Tags:
LATUR