भाजपाच्या उमेदवाराला 'देवाला'घेवून फिरायची आली वेळ..! कांग्रेसच्या उमेदवाराला भाजपाकडे पाहायला नाही वेळ !
लातूर -लातूर मध्ये विधानसभा निवडणूककीचे वारे अतिशय तेज गतीने वाहत आहेत या मध्ये काॅंग्रेस ने काय केले? आणि १५ दिवसांपुर्वी आलेला उमेदवार काय करणार..? अशी चर्चा संपुर्ण लातूर जिल्ह्यात चालू आहे त्यातच 'देवघर' आणि 'देव' यावरही प्रकर्शाने लातूरकर चर्चा करत आहेत नेमका हा 'देव' कोणाच्या पाठीशी आहे यावरुन रस्सीखेच चालू असताना मात्र भाजपने आता देवालाचं सोबत घेवून फिरवले आणि तशी वेळ काॅंग्रेसच्या उमेदवारानी आपल्या कामातून आणली.सकाळी दहा ते रात्री १०पर्यंत बैठका,प्रचार सभेने तसेच लिंगायत समाजाच्या ऋणनिर्देश सोहळयाने हादरुन गेलेले भाजपा
स्वत:ला वाचवण्यासाठी हा सगळा खटाटोप करत आहेत परंतू ते विसरले कि,देवाला ते घेवून फिरतील मात्र देवाचा असलेला काॅंग्रेसचा विचार कसा काय काढू शकतील ?असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे.
लातूरच्या विकासाबाबत काॅंग्रेसच्या उमेदवाराला काय करायचे आहे याबाबत विविध मुद्दे मांडले आहेत परंतू पंधरा दिवसांपुर्वी आलेल्या भाजपच्या उमेदवाराकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते फक्त काॅंग्रेसच्या विचाराचा 'देव' घेवून फिरत आहेत त्यामुळेचं काॅंग्रेसच्या उमेदवाराला ही भाजपाकडे बघायला वेळ नाही
या वरुन मतदानानंतरं देवाचा आशिर्वाद फिक्स असल्याने
निकाल तर स्पष्ट असल्याचे चित्र दिसत आहे.