ऋषिकाताई पाटील चाकुरकर यांनी केले रक्तदान
लातूर/ प्रतिनिधी:रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.या माध्यमातून आपण एखाद्याला जीवदान देऊ शकतो,याचे भान ठेवत ऋषिकाताई पाटील चाकूरकर यांनी स्वतः रक्तदान करत कार्यकर्त्यांसमोर आदर्श ठेवला.
आपली आई तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारात ऋषिकाताई हिरिरीने सहभाग घेत आहेत. मतदारसंघातील विविध भागात पदयात्रा काढत त्या नागरिकांशी व महिलांशी संवाद साधत आहेत.वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे.या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ऋषिकाताई सहभागी होत आहेत.
शनिवारी ऋषिकाताई शहरात पदयात्रेत होत्या.मारवाडी राजस्थान शाळेच्या परिसरात असताना फटाका मार्केटमध्ये लातूर जिल्हा फटाका असोसिएशनच्या वतीने
रक्तदान शिबिर सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली.ही माहिती मिळताच ताईंनी स्वतः रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त करत शिबीर गाठले.शिबिरस्थळी असणारे रक्तदाते व उपस्थितांशी संवाद साधला.त्यांनी स्वतः रक्तदान केले.त्यांच्या समवेत असणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही यावेळी रक्तदान केले. लातूर जिल्हा फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.
न्यू अर्पण ब्लड सेंटरच्या वतीने या शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलन केले जात होते.
ऋषिकाताईंनी त्यात स्वतः सहभागी होत आदर्श ठेवला.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.