शांत, सुरक्षीत, प्रगतीशील लातूरसाठी लातूरकरांचा कौल सर्वांचा विश्वास सार्थ ठरवेन
आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनीधी) : शनीवार दि. २३ नोव्हेबर २४
आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनीधी) : शनीवार दि. २३ नोव्हेबर २४
शांत, सुरंक्षीत, सामाजिक सलोख्याच्या प्रगतीशील लातूरसाठी लातूर शहर
विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला कौल दिला आहे. त्याचा नम्रतापूर्वक
स्विकार करीत असून तमाम लातूरकरांच्या विश्वासाला पात्र रहाण्याचा
प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण
सांस्कृतीक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाविकास
आघाडी, काँग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार आमदार अमित विलासराव देशमुख
यांनी व्यक्त केली आहे.
लातूर शहर मतदारसंघात विजयी मिळवल्यानंतर बोलतांना आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी म्हटले आहे की, एकूण प्रचार काळात लातूरला शांत, सुरंक्षीत
आणि प्रगतीशील ठेवण्याचे त्यांच बरोबर येथील सामाजिक सलोखा अबाधित
राखण्यासाठी प्रयत्नशील रहण्याचे आश्वासन आम्ही काँग्रेस महाविकास
आघाडीच्या जाहीरनामातून दिले होते. या आश्वासनाला लातूरकरांनी कौल दिला
आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाला बांधील राहून
लातूरला कायम प्रगतीपथावर ठेवण्यासाठी भविष्यात मी कायम प्रयतनशील राहणार
आहे.
या मतदारसंघातील हा विजय सकारात्मक प्रचाराचा, सत्याचा, संवीधानाचा आणि
लोकशाहीचा विजय आहे असे मी मानतो. महाविकास आघाडी व काँग्रेस पदाधिकारी,
कार्यकर्ते यांनी घेतलेल्या परिश्रमाचा, हितचिंतकांनी दिलेल्या
पाठींब्याचा हा विजय आहे असे मी मानतो, त्यामुळे या सर्वासोबतच लातूरच्या
सर्व जनतेचे मी आभार मानतो आहे, असे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे. माझा
शहर मतदारसंघात विजय झाला असला तरी लातूर ग्रामिण तसेच अनेक मतदारसंघात
आपणाला अपेक्षित यश मिळाले नाही त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी
नाउमेद होऊ नये, आपण त्या ठिकाणी पून्हा लढू आणि जिंकू, असा विश्वास
आमदार अमित देशमुख यांनी शेवटी व्यक्त केला आहे.