भाजपा महायुतीच्या लबाडांना आता घरी बसवा
श्रीमती वैशालीताई देशमुख यांचे आवाहन
लातूर : प्रतिनिधी
राज्यातील भाजपा महायुतीच्या सरकारने खोटे बोलून जनतेची फसवणुक केली आहे़
जाती, धर्मात भांडणे लावून स्वत:चा स्वार्थ साधण्या पलिकडे सत्ताधाºयांनी
काहींच केले नाही़ भूलथाप, दिशाभूल आणि खोटे बोलणे हेच या सत्ताधाºयांनी
केले आहे़ काँग्रेस महाविकास आघाडीने जनसामान्यांच्या हितासाठी विकासाची
पंचसुत्री जाहीर केली आहे़ त्यामुळे तमाम मतदार भगिणींनी काँग्रेस
महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित देशमुख
यांना प्रचंड मतांनी विजय करुन भाजप महायुतीच्या लबाडांना आता घरी बसवा,
असे आवाहन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई
विलासराव देशमुख यांनी केले़
काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित
देशमुख यांच्या प्रचारर्थ दि़ १५ नोव्हेबंर रोजी सायंकाळी लातूर
तालुक्यातील कव्हा येथे श्रीमती वैशालीताई देशमुख यांची पदयात्रा झाली़
त्यावेळी त्या बोलत होत्या़ यावेळी सुनिता अरळीकर, विमलताई बर्वे,
भाग्यलक्ष्मीताई रुकमे यांची प्रमुख उपस्थिती होती़ पुढे बोलताना श्रीमती
वैशालीताई देशमुख म्हणाल्या, काँग्रेस महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात
‘मविआ’ने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतानाच शेतकºयांच्या शेतमालाला
योग्य भाव दिला़ महिलांना, मुलींना सुरक्षा दिली, आरोग्याच्या सुविधा
निर्माण केल्या, सिंचन, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, कायदा
व सुव्यवस्था आबाधित राखणे, शांतता, पाणी, रस्ते, वीज या सर्व सुख सोई
निर्माण केल्या़ आपले उमेदवार अमित देशमुख यांनी लातूरसाठी २४०० कोटी
रुपयांचा विकास निधी आणला़ या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली
आहे़ ज्या कामांची मंजूरी घेतलेली आहे तीही विकास कामे सुरु होत आहेत़
त्यामुळे मतदारांनी भूलथापांना बळी न पडता माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांच्या नावापूढील हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी
करावे, असे आवाहनही त्यांनी केले़
या प्रचार रॅलीत अनुराधा सारगे, मीरा सारगे, उषा सारगे, अनुसया कलबोने,
बालिका सारगे, मदिना शेख, वैशाली बोटले, अश्विनी सारगे, सुवर्णा सारगे,
अनुसया पिटले, सुवर्णा इरले, मिनाबाई कांबळे, चंद्रकला कांबळे, संगीता
भालेराव, शोभाबाई भालेराव, केवळबाई कांबळे, सुनीता गायकवाड, शालू मगर,
संगीता चांदणे, विमलबाई चांदणे, खातून शेख, दैवशाला गदले, दैवशाला
सातपुते, विमलबाई देशमुख, विजयाबाई चांदणे शांताबाई देशमुख, शांताबाई
देवकते, विजयमला इरले, पार्वती कांबळे, लायक सय्यद, कांचना वाघमारे,
केवळबाई सरवदे, वच्छला कवरे, महानंदा कांबळे यासह आदी महिला व काँग्रेस
पक्षाचे कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते़