माजी जि.प. सभापती राजकुमार पाटील यांचा शेकडो युवकांसह भाजपात प्रवेश
निलंगा/प्रतिनिधी:आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे हात मजबूत करण्यासाठी,
विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी तसेच निलंगा मतदारसंघातून आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विजयासाठी माजी जि.प.सभापती राजकुमार पाटील यांच्यासह साकोळ येथील शेकडो युवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.माजी मंत्री आ.निलंगेकर यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
या कार्यक्रमास माजी खासदार डॉ.सुनिल गायकवाड, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.विविध लोककल्याणकारी योजना राबवत विकसनशील भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील सर्वांचीच मने जिंकली आहेत. याच कारणास्तव सर्व स्तरातील नागरिकांचा भाजपकडे कल वाढला आहे.राज्याच्या उज्वल भविष्यासाठी महायुती हाच पर्याय असल्याने हजारोंच्या संख्येने युवक भाजपासोबत जोडले जात आहेत.युवकांची हीच शक्ती राज्यात महाविजय घडवून आणेल व पुन्हा एकदा राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे महायुती सरकार येईल,असा विश्वास यावेळी निलंगेकर यांनी व्यक्त केला.
भाजपात प्रवेश घेणाऱ्यांमध्ये शिवराज भुरे,शेषराव भुजंग, मनोज आवाळे,सचिन माळी, मनोज मोरे,संजीव भुरे,कोंडीराम माळी,बालाजी मुळजे, मुरलीधर माळी,शिवा ईटकर,पिंटू ईटकर, रामेश्वर ईटकर,बाळासाहेब पाटील,धनराज चाळके, आकाश काळू,वैभव पाटील,सचिन कवठाळे,सुशील बळी,मनोज स्वामी,राज भुसनुरे,ओमकार हंडरगुळे,माधव सूर्यवंशी, साहिल सूर्यवंशी,प्रशांत घंटे,तानाजी तेलंग,निलेश कांबळे,प्रमोद बरगे, माधव सूर्यवंशी,सचिन सूर्यवंशी, राजकुमार सोलगे,परमेश्वर डोंगरे, राम ईटकर,मनोज मोरे, लक्ष्मण भुसनुरे,प्रकाश पांचाळ, श्रीनिवास हंकारे,बस्वराज हंडरगुळे,राजकुमार पांचाळ, आकाश भुजंग,सतिश करंडे, संतोष पाटील,सुरेश लुल्ले, सोपान माळी,नंदकिशोर माळी, अमर माळी,आकाश माळी, दिनेश माळी,अनिल पाटील, संतोष पाटील,पिंटूजी करंडे, राजकुमार दरेकर,भानुदास सूर्यवंशी,बाळू ईटकर, परमेश्वर डोंगरे,अमर माळी,राजू दरेकर, उदय करंडे,राजूजी सोलगे यांच्यासह असंख्य युवकांचा समावेश आहे.