Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

संभाजीराव पाटील निलंगेकर यांची विजयाची हॅट्रिक, निलंग्यात जल्लोष

संभाजीराव पाटील निलंगेकर यांची विजयाची हॅट्रिक, निलंग्यात जल्लोष
 13हजार 740 मतानी विजयी,निलंगा विधानसभेवर पुन्हा निलंगेकर विजय








निलंगा ; निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर हे 13 हजार 740 मतांनी विजयी झाले. तर काँग्रेसचे प्रतिस्पर्धी अभय साळुंके 98 हजार 628 मताधिक्य घेऊन द्वितीय क्रमांकावर राहिले. तर वंचितचे मंजुषा निंबाळकर तिन हजार 898 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. यामुळे निलंग्यात पुन्हा कमळ फुलले आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे.
निलंगा विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत अभय साळुंकेचा जरी पराभव झाला असला तरी त्यांनी 98 हजार 628 आपल्या पारड्यात मते पाडून घेतले. तर आकाश पाटील 979 ,ज्ञानेश्वर कांबळे 804 ,नागनाथ बोडके 1388 , हनुमंत धानुरे 430 , अन्वर हुसेन सय्यद 79 , दत्तात्रय सूर्यवंशी 186 , दत्तात्रय सूर्यवंशी 103 , निळकंठ बिरादार 198, फैज मिया शेख 603 , मेहबूब पाशा मुल्ला 294 मते मिळाली. तर नोटाला 915 मते पडली आहेत. असे एकूण 2 लाख 17 हजार 238 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यात भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना 1लाख 12 हजार 368 मते पडल्याने त्यांचा 13 हजार 740 मतांनी विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष करत चौका चौकात फटाक्याची आतषबाजी करत गुलाल उधळून पेढे वाटत आनंद साजरा केला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत शहरामध्ये विजय जल्लोष साजराा करण्यात आला ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या जल्लोष मध्ये हातात भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. पहिल्या फेरीपासूनच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना मताधिक्याची लीड मिळत होती. यामध्ये निलंगा शहर व मतदार संघातील मोठे गावांमध्ये फारशी मताधिक्य मिळाले नाही. निलंगा विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर विजयी झाले तर तिसऱ्यांदा विजयी होऊन त्यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला होता प्रारंभी पोस्टल मताची मोजणी झाली निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी संभाजी पाटील निलंगेकर हे विजयी झाल्याचे घोषित केले.
Previous Post Next Post