Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद







काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला
लातूर (प्रतिनीधी) : मंगळवार दि. १२ नोव्हेबर २४
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत दि़ १२
नोव्हेंबर रोजी सांयकाळी शहरातील प्रभाग ५, १६, १७, व १८ या भव्य प्रभागांतून भव्य
प्रचार रॅली काढण्यात आली़ या रॅलीला या चारही प्रभागांतील मतदारांनी
उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला युवती मोठया प्रमाणात या रॅलीत
सहभागी झाले होते. महीलांची, युवकांची संख्या लक्षणिय होती़
प्रभाग क्रमांक १७ येथील रुद्रेश्वर हनुमान मंदीर येथे माजी मंत्री आमदार
अमित विलासराव देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे
स्वागत करण्यात आले़
तेथून प्रचार रॅलीस सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी
परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी
काढून मार्ग सुशोभित केला होता.,अनेक घरांच्या छतावरुन रॅलीवर
पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन
मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते. रॅली
सोनी गार्डन, एलआयसी कॉलनी, जुना खोपेगाव रोड व वसंतराव नाईक चौक येथून
प्रभाग १६ मधील मधील मंत्री नगर, बोधे नगर, कावळे नगर, कपडा मील कॉर्नर,
बुध्द गार्डन, सुपारी हनुमान व कन्हेरी चौक येथून प्रभाग क्रमांक १८ पटेल
चौक, ड्रायव्हर लाईन, परमेश्वर चौक, नंदनवन कॉलनी, मजगेनगर व मंठाळे नगर
येथून पूढे प्रभाग ५ मध्ये गौसपूरा, कोल्हेनगर, कृष्णानगर, गणेश चौक येथे
समारोप झाला. मंगळवारी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख
यांच्या निघालेल्या प्रचार रॅलीने शहराचा हा भाग महाविकास आघाडीमय
झाला़ युवकांचा सहभाग लक्षणिय होता़ ‘महाविकास आघाडीचा विजय असो’, ‘अमित
देशमुख तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा घोषांचा संपूर्ण परिसरात
आवाज घुमला़ महिला, युवती, पुरुषही मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी
झाले होते़.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी
महापौर दीपक सूळ, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, लक्ष्मीकांत नावंदर,
बालाप्रसाद बीदादा, अनुप मलवाड, विद्याताई पाटील, बबन कावळे, सिकंदर
पटेल, प्राध्यापक संजय जगताप, प्रवीण घोटाळे, नामदेव ईगे, लक्ष्मीकांत
मंठाळे, साक्षी घोटाळे, राम स्वामी, प्रवीण सूर्यवंशी, अकबर माडजे, सुंदर
पाटील कव्हेकर, अविनाश बट्टेवार, अजगर पटेल, स्वयंप्रभा पाटील, सागर
मुसंडे, श्रीदेवी औसेकर, खाजाबानू अन्सारी, ऋषिकेश पाटील, गोविंद सुरवसे,
जानीहासन साब, व्यंकटेश पुरी, अविराजे निंबाळकर, सुरज पांचाळ, अक्षय
चव्हाण, अरबाज शेख, विशाल पाटील, नासीर चाऊस, राजू कुऱ्हाडे, जीवन
सुरवसे, बालाजी सोनटक्के, फकीरा जोगदंड आदीसह काँग्रेस, राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,
शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक,
पदाधिकारी, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
----
Previous Post Next Post