Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोष ! डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग

अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोष !
डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेत हजारो नागरिकांचा सहभाग

यात्रेवर जेसीबीतून पुष्पवृष्टी



     लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या रविवारी सायंकाळी लातूर शहरात निघालेल्या पदयात्रेत अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोष पहायला मिळाला.हजारो नागरिक व मतदारांनी सहभागी होत अर्चनाताईंना पाठिंबा व्यक्त केला.पदयात्रेवर जेसीबीतून पुष्पवृष्टीही करण्यात आली.
      रविवारी सायंकाळी शहरातील दयानंद गेट परिसरातून डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेस प्रारंभ झाला.दयानंद गेट परिसरातून निघालेली ही पदयात्रा खाडगाव रोड या भागात गेली.वाले इंग्लिश स्कूल,वडार समाजाचे वीर हनुमान मंदिर,वीर फकिरा चौक ते खाडगाव रोडच्या शेवटच्या टोकापर्यंत यात्रा पोहोचली.तेथून प्रकाश नगर मार्गे संविधान चौक व नंतर हनुमान मंदिरात आरती करून या पदयात्रेचा समारोप झाला.
      सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली पदयात्रा सुमारे दोन तास चालली.या पदयात्रेत उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील यांच्यासह माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी,राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील,मीनाताई गायकवाड, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे मोहसीन शेख,निखील गायकवाड,महेश कौळखेरे,
संतोष पांचाळ,ओम धनुरे यांच्यासह महायुतीचे असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.
     पदयात्रेदरम्यान डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना महिलांनी हळदी-कुंकू लावून औक्षण केले.पुष्पहार घालून ताईंचे स्वागत करत निवडणुकीतील विजयासाठी त्यांना नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या विविध दुकानात जात ताईंनी व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या.रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांशी आणि वाहन चालकांशीही ताईंनी संवाद साधला.ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या पदयात्रेदरम्यान युवकांनी ठेका धरल्याचेही पहायला मिळाले.

   चौकट....
  जेसीबीतून पुष्पवृष्टी
     खाडगाव रस्ता परिसरात डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या पदयात्रेवर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. धनराज सूर्यवंशी यांनी ताईंच्या स्वागतासाठी ही पुष्पवृष्टी केली.

 अपंगाकडून स्वीकारला सत्कार...
      पदयात्रेदरम्यान प्रचंड गर्दी असतानाही एक अपंग युवक कुबडीच्या आधाराने हातात पुष्प हार घेऊन ताईंची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा होता.
गर्दीत त्याला उभे राहणेही शक्य नव्हते.ही बाब ताईंच्या नजरेस पडली.ताईंनी तात्काळ त्या युवकाच्या जवळ जात त्याचा पुष्पहार आणि शुभेच्छांचा स्वीकार केला.

खाडगाव रोड जॅम ...
  पदयात्रेमुळे खाडगाव रोडवर प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. वर्दळीच्या या रस्त्यावर पदयात्रेनिमित्त हजारोंचा जमाव चालत होता.अग्रभागी असणाऱ्या डॉ. अर्चनाताई पाटील सर्वांचे अभिवादन आणि शुभेच्छांचा स्वीकार करत होत्या. रस्त्यावरून येणारे-जाणारे नागरिक व वाहनचालकही आपली वाहने उभी करून ताईंना शुभेच्छा देण्यासाठी येत होते.यामुळे बराच वेळ खाडगाव रोड जॅम झाल्याचे चित्र दिसून आले.सर्वत्र ताईंच्या विजयाच्या घोषणा सुरू असल्याचेही पहायला मिळाले.
Previous Post Next Post