केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आज देवणीत
आ.निलंगेकर यांच्या प्रचारार्थ जन स्वाभिमान सभा
निलंगा/प्रतिनिधी:देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे मंगळवारी (दि.१२ )सकाळी देवणी येथे येणार आहेत.निलंगा विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रचारार्थ देवणी येथे आयोजित जन स्वाभिमान सभेला ते संबोधित करणार आहेत,अशी माहिती भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
देवणी येथील बस स्थानकासमोर असणाऱ्या धोंडीराम पाटील मैदानात सकाळी १०.३० वाजता ही सभा होणार आहे.या सभेस उमेदवार आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून आणि पाठपुराव्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निलंगा मतदारसंघाला आतापर्यंत भरभरून विकास निधी दिलेला आहे.गडकरी यांच्यामुळेच निलंगा मतदारसंघात व लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे.या विकासपुरुषाच्या दूरदृष्टीमुळे भविष्यात मतदारसंघात आणखी विकास कामे होणार आहेत.मागील काळात निलंगा मतदारसंघातील जनतेच्या स्वाभिमानाला ठेस पोचवण्याचे काम कांही मंडळींकडून केले जात आहे.त्याला उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे
मंगळवारी सकाळी १०:३० वाजता बसस्थानका समोरील धोंडीराम पाटील मैदान येथे ही सभा होणार आहे.या जन स्वाभिमान सभेस मतदारसंघातील भाजपा महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस शेषराव ममाळे,तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,बाजार समिती सभापती काशिनाथ पाटील,शहराध्यक्ष अमर पाटील,उपसभापती भाऊराव मस्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.