Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

फुटपाथचे नियमबाह्यरित्या राबविण्यात येत असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात सचिवाकडे तक्रार

फुटपाथचे नियमबाह्यरित्या राबविण्यात येत असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात सचिवाकडे तक्रार 
 


केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) योजने अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या करिता विविध कामे करण्याच्या करिता प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून लातूर महानगर पालिकेच्या वतीने फुटपाथचे नियमबाह्यरित्या राबविण्यात येत असलेल्या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात सचीव,नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडे ॳॅड.सुरज साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार यांनी ईमेल द्वारे करण्यात आली आहे त्यामुळे महानगरपालिकेमध्ये एकचं खळबळ उडाली आहे 

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप) योजने अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या करिता विविध कामे करण्याच्या करिता प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून लातूर महानगर पालिकेच्या वतीने संदर्भिय विकास काम करणे बाबत दि. 14/10/2024 रोजी निविदा प्रसिद्ध केलेली होती. सदर निविदा दि. 22/10/2024 रोजी उघडण्यात येणार होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमुळे आचार संहिता लागू झालेली असल्याने संदर्भिय कामाचा पुढील कार्यवाही स्थगित करण्यात आलेली होती. परंतु काही दिवसापूर्वी सदर
कामाच्यासंबंधी तांत्रिक लिफाफा उघडण्यात आलेला आहे. सदर निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदविलेल्या कंत्राटदाराची नावे पुढील प्रमाणे :

1. मे. गिरजाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. लातूर

2. मे. श्रीसमर्थ कन्सट्रक्शन, लातूर

3. मे. अण्णाप्पा महरुद्रप्पा गुड्डागी, लातूर

4. मे. श्रीनाथ इंजिनीयर्स, लातूर

5. मे. एस. एस. साठे प्रा. लि. पुणे

वरील नमूद कंत्राटदारापैकी मे. गिरजाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. लातूर या कंत्राटदारास संदर्भिय काम मॅनेज करून देण्याच्या करिता त्याबाबतचे सर्व व्यवहार व सोपस्कार लातूर शहरातील संतोष व कल्याणी नामक व्यक्तीच्या मार्फत पार पाडून लातूर महानगर पालिकेचे प्रशासक श्री. मनोहरे हे निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचार्यामार्फत निविदेमध्ये कमी दर असलेल्या कंत्राटदाराना विविध तथ्यहिन कारणाच्या आधारे अपात्र ठरवून त्यांना निविदा प्रकियेमधून बाहेर काढण्याच्या करिता तत्पर असून, वास्तविक पाहता सदर निविदा प्रकियेमध्ये सहभागी झालेल्या पाच पैकी तीन कंत्राटदार हे प्रस्तुतची निविदा भरण्यास तांत्रिक व आर्थिक दृष्टीकोणातून अपात्र असून संबंधितानी सादर केलेले बहुतांश कागदपत्र हे चुकीचे व बनावट असून असे असताना देखिल लातूर महानगरपालिकेचे प्रशासक केवळ मे. गिरजाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. लातूर या कंत्राटदारास संदर्भिय काम देण्याच्या करिता अट्टहास करित आहेत.

संदर्भिय विकास कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शक व कायदेशीर तरतुदीचा अवलंब करून राबविणे आवश्यक असताना व कामाच्या निविदा प्रक्रीये मध्ये स्पर्धा होवून L-1 कंत्राटदारास सदरचे काम देणे आवश्यक असताना देखील लातूर मनपा प्रशासन व बांधकाम विभागाकडून हेतु परस्परपणे व ठराविक राजकीय पक्षाच्या व्यक्तीस हाताशी धरून व त्यांच्या सोबत संगनमत करून संदर्भिय विकास कामामध्ये भ्रष्टाचार करण्याच्या दुष्ट हेतूने केवळ ठराविक कंत्राटदारासच प्रस्तुतचे काम देण्याचा घाट घालण्यात आलेला आहे. सदर गैरप्रकाराबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता वरिष्ठांचा त्याबाबत तोंडी आदेश असल्याचे त्यांच्याद्वारे सांगतिले जात आहे. वास्तविक पाहता महापालिकेद्वारे करण्यात
येणाऱ्या सर्व विकास कामामध्ये खुल्या निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यात येत असताना देखील संदर्भिय निविदा प्रक्रियेमध्ये वरील नमूद लोक हे ठराविक कंत्राटदारास हाताशी धरून व त्यांच्याशी संगनमत करून प्रस्तावित कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये सुरवाती पासूनच भ्रष्टाचार करण्याच्या दुष्ट हेतूने षडयंत्र रचत आहेत. त्यामुळे भविष्यात महापालिकेच्या कोट्यावधी रुपयाचे नुकसान होणार आहे.

तसेच श्री. मनोहरे हे लातूर महानगरपालिके मध्ये प्रशासक म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी त्यांच्या धाराशिव नगर पालिकेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराचा पॅटर्न लातूर शहर महानगरपालिके मध्ये राबविण्याचा पराक्रम केलेला असून, त्यांच्या कार्यकाळामध्ये लातूर शहर महानगरपालिके मध्ये राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये केवळ ठराविक कंत्राटदार सहभागी झालेले असून, लातूर महानगरपालिके मार्फत निविदा राबविण्यात येत असतेवेळी ज्या निविदा मॅनेज करण्यात आलेल्या आहेत त्या निविदेमधील सहभागी कंत्राटदाराच्या कागदपत्राची योग्यरित्या छाननी न करताच कंत्राटदारास कार्यादेश निर्गमित करण्यात येतो. व तसेच निविदा प्रकियेमध्ये संबंधित कंत्राटदारा सोबत रहीम व कल्याणी नामक व्यक्तीच्या मार्फत 10 ते 15% प्रमाणे व्यवहार ई. करून ठराविक कंत्राटदारास कामे देण्याचा सपाटा मनपा प्रशासकाने लावलेला आहे. याउपर एखाद्या कंत्राटदाराने यांचा आदेश डावलून निविदा प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला असता त्यास तांत्रिक कारण देवून किंवा जिओ-टॅग नसल्याचे कारण देवून निविदा प्रक्रियेमधून अपात्र ठरविण्याचा गैरप्रकार केला जातो. त्याबाबत अनेक तक्रारी महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयात दाखल असून त्याबाबत आजवर आवश्यक ती कार्यवाही झालेली नाही.

तरि विनंती की, लातूर महापालिका प्रशासक व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याद्वारे राबविण्यात येत असलेली संदर्भिय निविदा प्रक्रिया सदोष व चुकीची व नियमबाह्य असल्याने ती तात्काळ रद्द करून संदर्भिय कामाची फेर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी. व सदर कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरिता सर्व पात्र कंत्राटदारांना समान संधी उपलब्ध करून देवून सर्वांना मुदतपूर्व geo tag प्रमाणपत्र देखिल उपलब्ध करून द्यावे. व तसेच वरील नमूद व लातूर मनपाद्वारे मागील दोन वर्षामध्ये राबविण्यात आलेल्या सर्व निविदे प्रकियेची विशेष समिती नेमून विस्तृत स्वरुपात चौकशी करून लातूर मनपाद्वारे नियमबाह्यरित्या राबविण्यात येत असलेल्या निविदा प्रक्रियामध्ये सहभागी अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध फौजदारी कार्यवाही करावी याबाबतची तक्रार सचीव,नगर विकास विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडे ॳॅड.सुरज साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार यांनी ईमेल द्वारे करण्यात आली आहे.
Previous Post Next Post