कर्त्तव्य दक्ष मोटार वाहन निरिक्षक शितल गोसावी यांचा लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघाच्या वतीने सत्कार
लातूर -प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सोमवार सकाळी ११ वाजता कर्त्तव्य दक्ष मोटार वाहन निरिक्षक शितल गोसावी यांचा लातूर जिल्हा युवा मोटार मालक संघाचे अध्यक्ष संदीप पाटिल यांच्या वतीने सत्कार करण्यात आला असून ,हा सत्कार मोटार वाहन निरिक्षक शितल गोसावी यांनी आज पर्यंत केलेल्या चांगल्या कर्याची ही पावती आहे. या सत्काराच्यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अनुशंगाने रस्ता सुरक्षा अभियानामध्ये
सातत्याने पुढाकार घेवून कार्य करणारे लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन चे अध्यक्ष जुगलकिशोर तोष्णीवाल हे सोबत होते तसेच लोकनायक मोटार चालक मालक संघाचे अध्यक्ष उत्तम लोंढे, कार्यालयातील मोटर वाहन निरिक्षक शांताराम साठे,मंगेश गवारे, संजय आड़े,सुनिल शिंदे,विशाल यादव आदी उपस्थित होते
Tags:
LATUR