Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक...*

गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक...*




गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधामध्ये लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक लातूर येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी व राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
... अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा, आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आलाय.. दरम्यान आज लातूरच्या महात्मा गांधी चौकात काँग्रेस कमिटीच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला...

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.किरण जाधव,मोईज शेख, ॲड.दीपक सूळ, गोरोबा लोखंडे, लक्ष्मण कांबळे, कैलास कांबळे,प्रवीण सूर्यवंशी, प्रा.प्रवीण कांबळे, इम्रान सय्यद, आसिफ बागवान, आतिश चिकटे, यशपाल कांबळे, प्रा.सुधीर अनवले, नागसेन कामेगावकर, दत्ता सोमवंशी, रणधीर सुरवसे, ॲड.गोपाळ बुरबुरे, दगडू मिटकरी, सिराज शेख, ॲड. देविदास बोरुळे पाटील, विजय गायकवाड, राज गवळी,सोमेन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post