Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

योजना कुठली? मंजूर केली कोण? वर्क ऑर्डर आहे का? भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करतय कोण?

*लातूर शहरात भारतीय जनता पक्षाकडून विकास कामाच्या भूमिपूजनाचा फार्स*
 
 *योजना कुठली? मंजूर केली कोण? वर्क ऑर्डर आहे का? भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करतय कोण?* 



 कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही काँग्रेस पक्षाने महापालिकेला विचारला जाब

लातूर (प्रतिनिधी): लातूर शहरात , विकास योजना भूमिपूजनाचा भारतीय जनता पक्षाकडून फार्स करण्यात येत आहे, योजना कोणती? वर्क ऑर्डर निघाली आहे का ? यासंबंधी कोणतीच माहिती न देता आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेत माहिती नसताना भूमिपूजन कार्यक्रम ठेवण्यात येत आहे, यासाठी संदर्भात आज काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जाऊन उपायुक्त श्री खानसोळे यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांनाही यासंदर्भात कोणती माहिती देता आली नाही,



या संदर्भातील माहिती अधिक माहिती अशी की,भारतीय जनता पक्षाच्या वतीने लातूर शहरात प्रभाग 14 मध्ये विकास कामाचे भूमिपूजन अशा आशयाच्या पोस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत,
प्रभाग 14 मधील ज्या विकास योजनेचे भूमिपूजन केले जाणार आहे त्याची महानगरपालिकेला काही कल्पना आहे का? यासंबंधी आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेत जाऊन आयुक्तांकडे विचारणा केली,
कोणत्या कामाची भूमिपूजन ? कोणी मंजूर केले? कोणत्या योजनेतून काम होत आहे? वर्क ऑर्डर आहे का? यासंबंधी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विचारणा केली असता, उपायुक्त श्री खांसुळे यासंबंधी काही उत्तर देऊ शकले नाहीत,
महानगरपालिकेला माहिती नसताना असे एखाद्या राजकीय पक्षाला भूमिपूजन करता येते का? याचेही समर्पक उत्तर त्यांना देता आले नाही,
लातूर शहरात, नेमके काय चालू आहे याचा ताळमेळ प्रशासकीय पातळीवर दिसून येत नाही, निधी कोण आणला? कोणत्या योजनेतून आणला?
कोणती एजन्सी काम करणार आहे , याचा कुठलाही ताळमेळ नसताना भारतीय जनता पक्ष भूमिपूजनाचा घाट का घातला जातो आहे, याचे उत्तर महानगरपालिकेत कोणीही देऊ शकलेले नाही, शासन आणि प्रशासन यांच्यात कोणताच ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. जर प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत अशा अनधिकृत भूमिपूजन सोहळ्याला पायबंद घातला नाही तर सभापती कडे तक्रार करण्यात येईल असे शिष्टमंडळाने महापालिकेला कळवले.
काँग्रेस पक्षाच्या या शिष्टमंडळात, माजी महापौर, सौ स्मिता खानापुरे दीपक सूळ, स्थायी समितीचे माजी माजी सभापती अशोक गोविंद गोविंदपुरकर, गोरोबा लोखंडे,युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान सय्यद, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, आयुब मणियार, दत्ता सोमवंशी, आसिफ बागवान, सिकंदर पटेल,बागवान, राजू गवळी, ॲड.गणेश कांबळे, नितीन कांबळे,काशिनाथ वाघमारे, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Previous Post Next Post