प्रादेशिक परिवहन कार्यालय होत असलेल्या भ्रष्टचारा सदंर्भात सर्व वाहतुकदार संघटना पुन्हा एकदा उपोषणास बसणार
लातूर -प्रादेशिक परिवहन
कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टचारा सदंर्भात सर्व वाहतुकदार संघटनानी काही दिवसांपुर्वी एकत्र येऊन एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते .त्यावेळेस लेखी निवेदन ही देण्यात आले होते. तेव्हा कार्यालयाच्या वतीने लवकरात लवकर आपल्या निवेदनाची दखल घेऊन दोषीवर विनाविलब योग्य ती कार्यवाही करू असे बोलुन उपोषण सोडवण्यात आले परंतू आजपर्यंत कार्यालयाकडून कसल्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे आजतरी दिसून येते असल्याने आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय पर्यायच उरला नाही म्हणून आम्ही दि. 21/01/2025 पासून सर्व वाहतुकदार संघटना एकत्र येऊन पुन्हा एकदा उपोषणास बसणार असल्याच दि १७जानेवारी रोजी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Tags:
LATUR