अहमदपूर तालुक्यातील एका पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत
लातूर -अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील एका पोल्ट्रीमध्ये जवळपास ४२०० ब्रॉयलर पिल्ले मृतावस्थेत आढळून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी औंध (पुणे) येथील राज्यस्तरीय पशुरोग निदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जावून आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्रीधर शिंदे यांनी दिली आहे.
Tags:
Ahmadpur