Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर

शेती आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प - आ.संभाजी पाटील निलंगेकर




  निलंगा /प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पातून शेती आणि शेतकऱ्यांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.उद्योजक, व्यावसायिक,तरुण अशा प्रत्येक घटकासाठी या अर्थसंकल्पाने काही ना काही दिले आहे,अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
  आ. निलंगेकर म्हणाले की, देशातील 100 जिल्ह्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आखण्यात आले असून 100 टक्के माल खरेदी केली जाणार आहे.यातून शेतकऱ्यांना सुविधा मिळणार आहेत. या अर्थसंकल्पामुळे कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असून असंख्य नव्या संधी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.
  मच्छीमारांना 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज,युवा उद्योजकांसाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढविणे हे महत्त्वपूर्ण निर्णय आहेत. स्टार्टअपसाठी कर्ज मर्यादा 20 कोटी रुपयांची करण्यात आली असून पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी राज्यांना 50 वर्ष बिनव्याजी कर्ज योजनेचाही फायदा होणार आहे.
  देशाला पुढे घेऊन जाणारा, सर्व समाजघटकांचा विचार करणारा हा अर्थसंकल्प आहे.यावर्षीच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त करून सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. मध्यमवर्गीय, पगारदार,कष्टकरी यांच्याबाबत आखलेल्या धोरणामुळे सामान्यांच्या विकासाला गती येणार असल्याची प्रतिक्रियाही आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post