Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शाहू कॉलेज ने उपोषणकर्त्या संदर्भात मांडली भुमिका;विद्यार्थ्यांच्या तक्रारी व अध्यापनात न होणारी सुधारणा..!

शाहू कॉलेज ने उपोषणकर्त्या संदर्भात मांडली भुमिका;विद्यार्थ्यांच्या तक्रारी व अध्यापनात न होणारी सुधारणा..!






लातूर -
लातूर येथील शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील शिक्षणसेवक श्री. यशवंत काशिनाथ जोपळे यांनी महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ आमोरण उपोषण सुरू केले आहे. दि. 04.02.2025 रोजी त्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कसा अन्याय झाला ही भूमिका विस्ताराने मांडली आहे.

संस्थेचा सचिव या नात्याने मला संस्थेची बाजू व सत्यप्रकार मांडणे आवश्यक वाटते. श्री. यशवंत काशिनाथ जोपळे यांची शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झाल्यानंतर त्यांना प्राचार्यांनी राजर्षी शाहू कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात जीवशास्त्र या विषयाचे शिक्षणसेवक या पदावर पवित्र पोर्टलच्या अटी व शर्ती नमुद करून नियुक्ती पत्र दिले होते. श्री. यशवंत काशीनाथ जोपळे यांच्याकडून पवित्र पोर्टलच्या विशिष्ट रखान्यात हमीपत्रही घेतले होते.

श्री. यशवंत काशिनाथ जोपळे हे जीवशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्या अध्यापनाबद्दल विद्यार्थ्यांनी तोंडी व विशेषतः लेखी स्वरूपात स्वताःचे नाव व स्वाक्षरीसहीत तक्रारी दाखल केल्या होत्या. ते अध्यापन करीत असलेले विषय आम्हाला अजिबात समजत नाहीत अशा प्रकारचे निवेदन तीन ते चार वेळा विद्यार्थ्यांनी दिले होते. प्राचार्यांनी प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्रत्यक्ष त्यांच्या निदर्शनास आणून त्यांच्याकडून खुलासाही घेण्यात आलेला आहे. तरीही अध्यापनात सुधारणा होत नाही व तक्रारी कमी होत नाहीत. त्यामुळे श्री. यशवंत काशिनाथ जोपळ यांचा शिक्षणसेवक हा तीन वर्षाचा कालावधी संपण्यापुर्वीच सेवामुक्त करण्यात आले आहे. 
असे निवेदनात म्हटले आहे 


Previous Post Next Post