Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बांबूसह इतर झाडे ज्यांनी लावले नाहीत त्यांच्या मयतीला लाकडं द्यायचे नाहीत

बांबूसह इतर झाडे ज्यांनी लावले नाहीत त्यांच्या मयतीला लाकडं द्यायचे नाहीत
सरकारकडे मागणी करणार-केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल 





 सध्या सगळीकडे तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे.त्यामुळे हवेतील गारवा संपत आलेला आहे तसेच तापमानाची वाढ थांबवायची असेल तर लोखंड वीज याचा वापर कमी करावा लागेल आणि तापमानातील वाढ थांबवण्यासाठी बांबूसह इतर झाडे लावले पाहिजेत ज्यांनी बांबूसह झाडे लावले नाहीत त्यांच्या मयतीला लाकडं द्यायचे नाहीत अशी मागणी मी सरकारकडे करणार असल्याचे केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी बोलताना सांगितले.
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना व लातूर कृषी नवनिर्माण ऍग्रो प्रोडूसर कंपनी नरवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या परिसरात आज दिनांक 7 ते 11 फेब्रुवारी 2025 दरम्यान कृषी नवनिर्माण 2025 या राज्यस्तरीय तिसऱ्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
 पाशा पटेल पुढे बोलताना म्हणाले की शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर शेतकरी जगला पाहिजे सध्या हवेतल्या वाढलेल्या तापमानामुळे शेतीच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होत आहे. सध्या लागणारी वीज आणि विजेला लागणारा कोळसा यामुळे तापमानामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे बांबूचे व इतर झाडे लावणे सध्या गरजेचे आहे. वर्षाला विजेची दुप्पट मागणी होत आहे. त्यामुळे कोळसा दुप्पट जाळला जात असल्याने तापमानात वाढ होत आहे. कार्बन आणि तापमान कमी केलं तर आपण जगणार आहोत त्यामुळे बांबूचे आणि इतर झाडे मोठ्या प्रमाणात लावून ते जगवले पाहिजेत असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
गेल्या ५ ते ७ वर्षापासून मराठवाडयातील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. सततच्या हवामानातील बदलामुळे कधी पाऊसच नाही तर कधी जास्तीचा पाऊस अशी विचित्र परिस्थीती झाल्याने कोणतेच पीक मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या हाती लागायला तयार नाही. त्यामूळे मराठवाडयातील शेतकरी कर्जबाजारी होऊन वैफल्यग्रस्त झाला आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी काँग्रेसचे नेते अभय साळुंखे म्हणाले की रस्त्यावर काम करण्याचा डोंगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे एवढी मोठी यंत्रणा जमवणे सोपं नाही ते मनसेने करून दाखवला आहे. त्यामुळे सरकारने स्वतः पुढे येऊन अशा कार्यक्रमाला मदत करणे गरजेचे आहे. लातूरची मनसे आपलं कर्तव्य करत आहे. तेव्हा या प्रदर्शनाला लातूरकरांनी साथ द्यावी असे आवाहन यावेळी अभय साळुंखे यांनी केले.
 या मनसेच्या कृषी प्रदर्शनाच्या सुरुवातीला मनसेचे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले त्यांनी प्रदर्शन संपताच लातूर जिल्ह्यात नवीन उपक्रम राबवणार असून तो म्हणजे शेतीचा दवाखाना येत्या महिनाभरात सुरुवात करणार असून याची सुरुवात रेनापुर तालुक्यातून करून संपूर्ण राज्यभर शेतीचा दवाखाना हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरकार, मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष नमाज आली, बीड जिल्हाध्यक्ष सुमन धास, हिंगोली जिल्हा अध्यक्ष बंडू कुठे,दिलीप गायकवाड,प्रशांत बारई,आधी उपस्थित होते. तर व्यासपीठावर भागवत शिंदे, सौ रेखाताई नागराळे, डॉ. नर्सिंग भीकाने, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, मनोज तात्या अभंगे, रवी सूर्यवंशी, रणवीर उमाटे, सचिन शिरसाट,किरण चव्हाण,प्रीतीताई भगत,भागवत कांदे, अंकुश शिंदे, पांडुरंग कदम, वाहेद भाई शेख,बाळासाहेब मुंडे, महेश देशमुख, सोमनाथ कलशेट्टी आधींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आभार नरसिंग भिकाने यांनी केले. यावेळी महाराष्ट्रभरातून आलेले स्टॉलधारक मनसेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी कांबळे यांनी केले
Previous Post Next Post