गावठी कट्टा बाळगणारा 17 वर्षीय बालक ताब्यात. दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काढतुस हस्तगत.
लातूर स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कारवाई.*
लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी आगामी सन उत्सव च्या अनुषंगाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून कार्यवाही करण्यात येत होती.
पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच दिनांक 29/03/2025 रोजी गांधी मार्केट परिसरातून एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन गावठी कट्टे (पिस्टल) हस्तगत करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर
1) 17 वर्षीय विधी संघर्ष बालक, राहणार मांजरी, तालुका जिल्हा लातूर, सध्या राहणार गोकुळ नगर पठार, वारजे माळवाडी, पुणे
2) व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुरे, राहणार सहयोग नगर, दत्त मंदिराजवळ, गोकुळ पठार, वारजे माळवाडी, पुणे.(फरार)
असे असून विधी संघर्ष बालकाकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काढतूस जप्त करण्यात आले.
याप्रकरणी पोलीस ठाणे गांधी चौक येथे भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास गांधी चौक पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांचे मार्गदर्शनात अतिशय उत्कृष्टरित्या गोपनीय माहितीचे संकलन व विश्लेषण करून करून गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलपटे , तुराब पठाण, नवनाथ हासबे, पाराजी पुठ्ठेवाड,युवराज गिरी, राजेश कचे, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, नकुल पाटील यांनी केली आहे.