मनपा गाळेधारकांचा व्याजमाफीस उस्फूर्त प्रतिसाद
लातूर /प्रतिनिधी : लातूर शहर महानगरपालिका मार्फत मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी दि.२१/०१/२०२५ ते दि. २८/०२/२०२५ पर्यंत मनपा मालकीच्या व बी ओ टी तत्वावरील गाळेधारकांना १००% व्याजामध्ये सुट दिलेली होती. सदर सुट ही आयुक्त, बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये दिलेली होती. सदर सुट कालावधीमध्ये उपायुक्त, डॉ.पंजाब खानसोळे व मालमत्ता व्यवस्थापक शुभम बावणे व सहा. मालमत्ता व्यवस्थापक पवन सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळे धारकांना १००% व्याजसुटीचा लाभ देऊन गाळे भाडे वसुली करण्याचे आदेश दिलेले होते. त्याअनुषंगाने आज दि. ०१/०३/२०२५ रोजी गांधी मैदान सा.क्रं. ११२ व्यापारी संकुलनामध्ये धडक वसुली मोहिम राबविण्यात आली होती. सदर व्यापारी संकुलनामध्ये आज रोजी चेकव्दारे रक्कम रु ११,०८,१८१/- व नगदी ३,२४,७८५/- असे एकूण १४,३२,९६६/- रु वसुली करण्यात आलेली आहे. तरी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळे धारकांनी तात्काळ एकरकमी थकबाकीचा भरणा करुन मनपास सहकार्य करावे, तसेच यापूर्वी सिल करण्यात आलेल्या गाळेधारकांना सूचित करण्यात येते की आपल्याकडील थकबाकी भरणा करुन घेण्यात यावी. अन्यथा सदर गाळयांचा ई-लिलाव करण्यात येईल. व ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे असे गाळे मनपा मार्फत सिल करुन सदर गाळयांचा ई-लिलाव ची होणारी कटू कार्यवाही टाळावी असे आवाहन उपायुक्त, डॉ. पंजाब खानसोळे यांनी केलेली आहे.