क्रॉप सायन्स (पीक शास्त्र) विषयाच्या शिक्षकाला वेतन लाभाविना शाहू कॉलेजने सोडले वाऱ्यावर
निवृत्त शिक्षकाचे दीड कोटी पेक्षा अधिक वेतन थांबून शाहू कॉलेजचे फक्त वेळ काढूनपणाचे धोरण
लातूर: दि. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ आमरण उपोषणकर्ते बालाजी व्यंकट झाडके यांना पाठिंबा चे पत्र देऊन संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव,प्राचार्य महादेव गव्हाणे यांची भेट घेऊन आमरण उपोषणावरती तोडगा काढण्याची विनंती केली एवढेच नाही तर आमरण उपोषणाचे गांभीर्य ओळखून कार्यकारिणीने तात्काळ बैठक घ्यावी व यावरती मार्ग काढावा अशी विनंती करण्यात आली. येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाचे निवृत्त शिक्षकाचे वेतन व लाभ देण्यासाठी शाहू कॉलेज येथे आमरण उपोषण करीत आहेत मात्र शाहू महाविद्यालय वेतन व लाभ देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. शाहू कॉलेजचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर क्रॉप सायन्स (पीक शास्त्र) या शिक्षकाने आणले त्याच विषयाच्या शिक्षकाला शाहू कॉलेजची 31 वर्ष इमाने इतवारे सेवा करून व वयोमानानुसार सेवानिवृत्त होऊनही वेतन व लाभ देण्यासाठी वेळ काढूपणाचे धोरण राबवत आहे. सेवानिवृत्त शिक्षक बालाजी व्यंकट झाडके हे गेली पाच वर्षापासून वेतन व लाभासाठी शाहू कॉलेजमध्ये चकरा मारत होते मात्र त्यांचे वेतन व लाभ देण्यासाठी जाणून बुजून न्यायालयाची भीती दाखवून वेतन व लाभ निवृत्त शिक्षकाला देण्यासाठी शाहू कॉलेज टाळाटाळ करीत आहे.उच्च न्यायालयाचे व स्कूल प्राधिकरणाचे वेतन व लाभ अदा करण्याचे आदेश डावलून शाहू कॉलेज वेतन व लाभ देण्यासाठी चाल ढकल करून वेळ काढूपणा करत आहे. त्यामुळे बालाजी व्यंकट झाडके हे 17 मार्च 2025 पासून राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे आमरण उपोषण करत आहेत.मात्र कॉलेज कार्यकारणीने भेट दिली नाही. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ आमरण उपोषणकर्ते बालाजी व्यंकट झाडके यांना पाठिंबा चे पत्र देऊन संस्थेचे सचिव अनिरुद्ध जाधव,प्राचार्य महादेव गव्हाणे यांची भेट घेऊन आमरण उपोषणावरती तोडगा काढण्याची विनंती केली एवढेच नाही तर आमरण उपोषणाचे गांभीर्य ओळखून कार्यकारिणीने तात्काळ बैठक घ्यावी व तात्काळ मार्ग काढावा अशी विनंती केली.यावेळी ॲड.उदय गवारे, ॲड. बाबुराव कदम ॲड. गणेश यादव ॲड. गोविंद शिरसाट, ॲड. विजय जाधव, पत्रकार लहूकुमार शिंदे, काकासाहेब घुटे, व्यंकट शिंदे उपस्थित होते.