विश्वेश्वरय्य अभियांत्रिकी महाविद्यालया मधील कॅम्पस मुलाखाती मध्ये२८२ विद्यार्थ्यांची निवड
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनि इंजिनीअर म्हणुन नियुक्ती
औसा/प्रतिनिधी :
औसा तालूक्यातील आलमला येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महा-विद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, सिव्हील इंजिनीअरिंग व मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची पुणे येथील बजाज अॅटो लि., पुणे, कमिन्स इंडिया लि., पुणे, कॅरिअर मिडीया इंडिया प्रा. लि., अहमदनगर, आयजीडब्ल्यु इंडिया टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पुणे, सुरज बिल्डकॉन प्रा. लि. क्या मल्टिनॅशनल कंपनीच्या स्वतीने ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयातील इलेक्टॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभागातील १२१ विद्यार्थी, ईलेक्ट्रीकल विभागातील ७७विद्यार्थी, मेकॅनिकल विभागातील
७८ विद्यार्थी व सिव्हील विभागातुन ०६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयातील इलेक्टॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. गोपाळ दंडिमे, प्रा. योगेश पाटील, यांचे इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. संदेश माडे, प्रा. सचिन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तर मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. मंगेश बिडवे, प्रा. विकास वाघमारे यांचे तसेच
सिव्हील इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. प्रविण साबदे, प्रा. रेवणसिध्द बुक्का, प्रा. उदय खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी संतोष गवळी यांच्या मार्गदर्शनाखली ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीत यश संपादन केले. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनि इंजिनीअर म्हणुन नियुक्ती झालेली असून त्यांना वार्षिक दोन लाखापासून अडीच लाखापर्यंतचे पॅकेज कंपनीव्दारा मिळणार आहे. येणाऱ्या काळात
मेक इन इंडियाच्या माध्यमातून अनेक परदेशी गुंतवणूक आपल्या देशामध्ये होवून त्यासाठी लागणा-या कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण होणार असून इंजिनीअरींग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना यामध्ये अनेक कुशल मनुष्यबळाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवेश्वर धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे, विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गोपाळ दंडिमे, विभागप्रमुख प्रा. रेवणसिध्द बुक्का, प्रा. प्रविण साबदे, प्रा. मंगेश बिडवे, प्रा. संदेश माडे, प्रा. अंकुश बिडवे, प्रा. चंद्रशेखर चरकपल्ले, प्रा. अजित लोकरे, प्रा. अब्दुल समद काझी प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.