Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

धनंजय मुंडेवर खूनाचा गुन्हा दाखल करा आरोपींना फाशी द्या, लातूरात जोडे मारो आंदोलन

धनंजय मुंडेवर खूनाचा गुन्हा दाखल करा आरोपींना फाशी द्या, लातूरात जोडे मारो आंदोलन





लातूर प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ फासावर लटकवा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनाही या प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा अशा मागण्या करीत मंगळवारी (दि.४) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व देशमुख हत्या प्रकरणातील अन्य आरोपींच्या पोस्टरला सकल मराठा समाजाने जोडे मारून त्याचे दहन केले.
मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सकाळी समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी भर उन्हात बैठक दिली. हाताला त्यांनी काळ्या फिती बांधल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतोष देशमुख यांच्या हत्येने मानवतेचीच हत्या झाली असून कायदा सुव्यवस्थेवर यामुळे मोठे प्रश्नचिन्ह आले आहे. सर्व सबळ पुरावे असताना मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही ? संतोष देशमुख हत्याकांडाच्या समाज माध्यमावरील त्या छायाचित्रांनी महाराष्ट्राचे , देशाचे काळीज सुन्न झाले, अंतकरण हळहळले पण सरकारची संवेदना कुठे हरवली होती? असा सवाल आंदोलकांनी केला. वाल्मीक कराडचा आका धनंजय मुंडे हे आहेत असाही आरोप आंदोलकांनी यावेळी केला. सर्व आरोपींना तत्काळ फाशी द्यावी . धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करावे अशा मागण्या करीत आंदोलकांनी वाल्मीक कराड धनंजय मुंडे तसेच अन्य आरोपींच्या पोस्टरला जोरदार घोषणाबाजी करीत जोडे मारले व ते जाळले.
Previous Post Next Post