Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वर्षानुवर्षे सिद्धेश्वर यात्रेचे नियोजन उत्कृष्ट - खा.डॉ.शिवाजी काळगे

वर्षानुवर्षे सिद्धेश्वर यात्रेचे नियोजन उत्कृष्ट - खा.डॉ.शिवाजी काळगे 

खासदार काळगे यांच्या हस्ते 
श्री सिद्धेश्वरांची महाआरती 




   लातूर/ प्रतिनिधी :श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्री यात्रेनिमित्त हे भक्त दर्शनासाठी येत असतात.देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून यात्रेचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले जात असून भक्तांना सोयी- सुविधा पुरविल्या जात आहेत, असे प्रतिपादन खा. डॉ. शिवाजी काळगे यांनी केले.
 डॉ. काळगे यांनी श्री सिद्धेश्वरांचे सपत्नीक दर्शन घेऊन महाआरती केली.मंदिर परिसराची त्यांनी पाहणीही केली. यावेळी देवस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना खा. डॉ. काळगे म्हणाले की, लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि सीमावर्ती भागात यात्रा प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाशिवरात्री यात्रेस लाखो भक्त येथे येतात. हे भक्त दर्शन घेण्यास सोबतच यात्रेचाही आनंद लुटतात. भक्तांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने प्रयत्न केले जातात.अनेक वर्षांपासून ही यात्रा सुरू असून दरवर्षी लौकिकात भर पडत असल्याचे डॉ.काळगे यांनी सांगितले.
   याप्रसंगी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, अशोक भोसले,बाबासाहेब कोरे, व्यंकटेश हालिंगे,विशाल झांबरे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.
Previous Post Next Post