Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औरा थाई स्पा वर धाड;स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ६ आरोपीं विरुद्ध AHTU ची कारवाई

औरा थाई स्पा वर धाड;स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या ६ आरोपीं विरुद्ध AHTU ची कारवाई
 ४ पीडित महिलांची सुटका करण्यात यश




     अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम औरा थाई स्पाच्या नावाखाली परराज्यातील महिलांना आणून त्यांचे कडून वेश्याव्यवसाय करवून घेत आहेत. 
लागलीच AHTU पथका कडून पंच यांचे समक्ष एक बनावट ग्राहक सदर स्पा वर पाठवले असता त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची खात्री पटताच पथकाकडून औरा थाई स्पा एस. एम. टॉवर, रेल्वे स्टेशन रिंग रोड, लातूर येथे दिनांक १२ एप्रिल रोजी अचानक छापा टाकण्यात आला.
सदर स्पावर आरोपी नामे 1) रोहन संजय वाघमारे, रा. प्रकाश नगर लातूर, 2) अनिरुद्ध इंगळे, रा. मंत्री नगर, लातूर व 3) परमेश्वर शिंदे, रा. विशाल नगर, लातूर हे स्पा चा मॅनेजर ४) शशिकांत विजयकुमार कांबळे, रा. शेल्हाळ , ता. उदगीर सध्या रा.लातूर व मदतनीस ५) औदुंबर गोरोबा बंडे रा. दीपज्योती नगर,लातूर. ६) ओमप्रसाद जयवंत शिंदे, रा. डिंकसल, ता. कळंब यांचे मदतीने परराज्यातील महिलांकडून थाई स्पा च्या नावाखाली स्वतःच्या फायद्यासाठी देहविक्री चा व्यवसाय व्यवसाय करून घेत होते.
सदर प्रकरणी ३ आरोपींना अटक करून ४ पीडित महिलांची सुटका करण्यात पथकाला यश आले आहे.
सदर प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ६ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री सुधाकर देडे हे करीत आहेत.
      सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात AHTU चे पोलीस निरीक्षक, श्री. समाधान चवरे, महिला पो.उप निरीक्षक, शामल देशमुख, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, सुधमाती यादव, लता गिरी, निहाल मनियार यांचे पथकाने केली आहे.
Previous Post Next Post