गृह निर्माण संस्थेचे बोगस व नियमबाह्य लेखा परीक्षण करून फसवणूक;आंदोलनाचा इशारा
: चेअरमन सुभाष निंबाळकर यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यगृह
लातूर : सन 2022 च्या काळातील सह निबंधक, लेखा परीक्षक वि. जे. वाळके आणि
एन. जी. सूर्यवंशी, संस्थेचे तोतया सचिव ओमप्रकाश आर्य, चेअरमन अशोक
मलवाडे, तोतया चेअरमन सत्यभामा दाताळ, व्हा. चेअरमन बालाजी गंगणे,
संचालक मधुकर राऊत, शिवाजी कांबळे, शरद शर्मा या सर्वांनी आपसात संगणमत
करून भ्रष्ठ मार्गाचा अवलंब करून बेकायदेशीर नियम बाह्यपणे लातूर शहरातील
स्वातंत्र्य संग्राम सैनिक नगर सह गृह निर्माण संस्थेचे 2019 ते 2022 चे
लेखा परीक्षण करून संस्थेची वं सहकार खात्याची फसवणूक करणाऱ्या सर्व
व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा येत्या 11 एप्रिल पासून जुने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत सत्यगृह आंदोलन करण्याचा
इशारा एका निवेदनद्वारे संस्थेचे चेअरमन सुभाष निंबाळकर यांनी दिला आहे.
सुभाष निंबाळकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी सदर गृह निर्माण
संस्थेचा अधिकृत चेअरमन असून याबाबतची माहिती सहा. निबंधक कार्यालयात
उपलब्ध आहे. तरी सहकार अधिकारी हे आपली चेअरमन पदी नेमणूक कशी झाली
म्हणून मलाच नोटीस बजावतात. ओमप्रकाश आर्य हे संस्थेचे सभासद नसताना
त्यांना संस्थेचे सचिव म्हणून सहा. निबंधक कार्यालय मान्यता कशी देते?
अशोक मलवाडे, शिवाजी कांबळे, बालाजी गंगणे यांनी संस्थेस व सहकार
न्यायालयास फसवले असून त्यांच्यावर त्यांच्यावर कलम 35 प्रमाणे कार्यवाही
झालेली असताना ते संस्थेचे पदाधिकारी कसे असू शकतात, असा प्रश्न निंबाळकर
यांनी उपस्थित केला आहे.
शिवाय सत्यभामा दाताळ, शरद शर्मा, मधुकर राऊत यांचे संचालक पद रद्द केले
असताना ते संस्थेचे चेअरमन व संचालक कसे? अशोक मलवाडे यांनी सत्यभामा
दाताळ यांचे नावावर चेअरमन म्हणून स्वाक्षरी करून फसवणूक केलेली सहा.
निबंधक कार्यालयास माहित असतानाही दांडात्मक कार्यवाही का केली जात नाही?
असा सवाल उपस्थित करून चेअरमन सुभाष निंबाळकर यांनी सदर संस्थेची व सहकार
खात्याची फसवणूक करणाऱ्या सर्व व्यक्ती विरुद्ध कठोर कार्यवाही करावी
अन्यथा लातूर येथील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 एप्रिल 2025
पासून न्याय मिळेपर्यंत सत्यागृह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या
आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, सहकार मंत्री, सहकार आयुक्त, लातूर येथील
सहकारी संस्थांचे विभागीय सह निबंधक, लातूर जिल्हा उपनिबंधक, सहकारी
संस्था, सहाय्य्क निबंधक यांना देण्यात आले आहे.