नवोदय मधील त्या नराधम शिक्षकाची कोठडीत रवानगी;या विद्यालयात लैंगिक आत्याचारा संदर्भात विशाखा समितीच स्थापन नाही
जवाहर नवोदय विद्यालय ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने स्थापन केलेली एक स्वायत्त संस्था आहे, जी ग्रामीण भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्थापन केली आहे.या शाळेचा उद्देश:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, संस्कार, मूल्ये, पर्यावरण जागरूकता, क्रीडा आणि राष्ट्रीय एकात्मता यांसारख्या घटकांवर भर देणे असा आहे.अशा शाळेत लातूर मध्ये काही दिवसापुर्वी नराधम सोपान कळमकर शिक्षकाने शिक्षकीपेशाला काळीमा फासणारे कृत्य केले आहेे तो शाळेतील तीन मुलांसोबत तब्बल तिन महिने अनैसर्गिक कृत्य करत होता याची भनक तेथील मुख्याध्यापकास लागली आणि तात्काळ त्या नराधमावर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.काही दिवसापुर्वी जिल्हाधिकारी यांनी सर्व शाळांना लैंगिक आत्याचारा संदर्भात विशाखा समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते परंतू हे आदेश नवोदय विद्यालयाने पाळले नाहित या ठिकाणी हि समितिच स्थापन नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे हि घटना समजण्यास महिने उलटले. याला जबाबदार असलेल्या मुख्याधापकांवरही कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.
लातूर : नवोदय विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या स्वतःच्याच तीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या नराधम सोपान कळमकर शिक्षकाला सात दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी मंगळवारी दि.१एप्रिल रोजीा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणारे नवोदय विद्यालय लातूरच्या बारानंबर पाटीजवळ आहे. मराठी माध्यमातील पाचवी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षा घेण्यात येते. यातून अतिहुशार विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे चाळणी करण्यात येते. निवड झालेल्या मोजक्याच विद्यार्थ्यांना ग्रामीण व शहरी भागातून प्रवेश देण्यात येतात. तेथे बारावी पूर्ण होईपर्यंत शिक्षण आहे. गुणवत्तापूर्ण केंद्रीय बोर्डाचे शिक्षण मिळेल, या आशेने अनेक पालक पाल्यांकडून अहोरात्र मेहनत करून घेतात. नवोदयमध्ये प्रवेश मिळवितात. परंतु, तेथे गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी दुसऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील सोपान राजाराम कळमकर या हिंदी विषयाच्या शिक्षकाने त्याच्याच तीन विद्यार्थ्यांवर सलग तीन महिने अनैसर्गिक लैंगिक कृत्य केल्याचे उजेडात आले आहे. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने सात दिवसांची दोनवेळा पोलीस कोठडी सुनावली होती. ती कोठडी मंगळवारी (दि. १) संपल्याने त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
दारू पिल्यानंतर शिक्षक सोपान कळमकर याच्या मनात वाईट विचार येऊन ते विद्यार्थ्यांसोबत अनैसर्गिक कृत्य करीत होता, असे पोलीस तपासात उघड होत आहे. पोलीस नवोदय विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांची चौकशी करीत आहेत. सध्या विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने त्यांची चौकशी करणे अवघड होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांच्या मित्रांसह सर्वच विद्यार्थ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.
Tags:
LATUR