लातुरात आयएमएचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न
आयएमएचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, सचिव डॉ. ऋषिकेश हरिदास तर महिला अध्यक्षपदी डॉ. ज्योती सूळ यांची निवड
लातूर : वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचे संघटन असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा लातूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा बुधवार 15 रोजी अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. माजी मंत्री आ. अमित देशमुख, खा. डॉ. शिवाजीराव काळगे, आरोग्य उपसंचालक डॉ. अर्चना भोसले,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते आदी मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
इंडियन मेडिकल असोसिएशन लातूरच्या अध्यक्षपदी डॉ. अभय कदम, सचिव डॉ. ऋषिकेश हरिदास तर महिला अध्यक्ष म्हणून डॉ. ज्योती सूळ, सचिव डॉ. प्रियंका डावळे, कोषाध्यक्ष डॉ. अपूर्वा चेपूरे, यांच्यासह उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, डॉ. वैशाली चपळगावकर, डॉ. ओमप्रकाश भोसले, डॉ. हनुमंत किणीकर, डॉ. आशिष चेपूरे, कोषाध्यक्ष डॉ. चांद पटेल, डॉ. दिपक गुगळे, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. राखी सारडा, डॉ. रचना जाजू, डॉ. अर्चना कोंबडे, डॉ. शारदा इरपतगिरे डॉ. चंद्रज्योती धनगे आदींची निवड करण्यात आली. यानंतर शहरालगत असलेल्या हॉटेल कार्नीव्हल या ठिकाणी आयोजित शानदार सोहळ्यात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी मंत्री अमित देशमुख यांनी मार्गदर्शन करताना शैक्षणिक, औद्योगिक आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या लातूर येथील सर्व डॉक्टर मंडळी अत्यंत सेवाभावाने रुग्णांची सेवा करीत असल्यामुळे हे शहर आता आरोग्य सेवेचे केंद्र म्हणूनही विकसित होत आहे, लातूरची ही नवीन ओळख अधिक दृढ होण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वतोपरी सहकार्य आणि प्रयत्न करीत आहोत, डॉक्टर मंडळींना कोणतेही अडचण येणार नाही यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा येथे उभारण्यात येत आहेत, लातूर आयएमएच्या मागणीवरून रुग्णालयाचा परवाना तीन वर्षाऐवजी तो पाच वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी आपण सरकारकडे
लावून धरली आहे, मुख्यमंत्र्यांनी ती मागणी तत्वता मान्य केली आहे त्यामुळे लवकरच तसा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होईल. डॉक्टरांच्या इतर मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठीही आपण तत्पर असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. यावर समाधान व्यक्त करत लातूरचे लोकप्रतिनिधी म्हणून नूतन अध्यक्ष डॉ. कदम यांनी बॉम्बे नर्सिंग होम अधिनियम रजिस्ट्रेशन बाबत असलेल्या अडचणी तात्काळ दूर व्हाव्यात तसेच यातील नूतनीकरणाची मुदत 3 वरून 5 पाच वर्षांची करावे, लातुरात आयएमए भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आदी मागण्या मांडण्यात आल्या, यावर आमदार अमित देशमुख यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महिला अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ यांनी महिला वर्गातील आजरांची संख्या पाहता येणाऱ्या काळात आपण महिलांच्या आरोग्यासाठी काम करणार असल्याचे यावेळी सांगितले. याप्रसंगी डॉ. चंद्रकांत शिरोळे, डॉ. आरदवाड, डॉ. सरिता मंत्री, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अजय जाधव, डॉ रमेश भराटे, डॉ. हंसराज बाहेती, डॉ. तोषणीवाल, डॉ. भाऊराव यादव, डॉ. सुरेखा निलंगेकर, डॉ. दाताळ, डॉ. वसुधा जाजू, डॉ. माधुरी कदम, डॉ. वैशाली दाताळ, डॉ. सलगर यांच्यासह लातूर आयएमएचे जवळपास 250 सदस्य सोहळ्यासाठी उपस्थित होते.